close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मॉलमध्ये गुप्तपणे चित्रित केलेला व्हिडिओ वायरल

मुंबईतल्या भांडुप येथील एका मॉलमध्ये एमएमएस प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा समोर येतोय. याच मॉलमध्ये गुप्तपणे चित्रित केलेला आणखी एक नवा व्हिडिओ व्हायरल झाला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.

Updated: Jul 8, 2017, 10:39 PM IST
मॉलमध्ये गुप्तपणे चित्रित केलेला व्हिडिओ वायरल

मुंबई : मुंबईतल्या भांडुप येथील एका मॉलमध्ये एमएमएस प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा समोर येतोय. याच मॉलमध्ये गुप्तपणे चित्रित केलेला आणखी एक नवा व्हिडिओ व्हायरल झाला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.

या व्हिडिओत एक प्रेमी युगुल अश्लील कृत्य करताना दिसतंय. हा व्हिडिओ सध्या अटकेत असेल्या पिंकू यादव आणि आनंद मीळीकर यांनी चित्रीत केलंय का? याची चौकशी सध्या पोलीस करत आहेत. या दोघांना १३ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. 

दरम्यान, नुकतंच भांडूमपध्ये सामूहिक बलात्काराची घटना उघड झाली आहे. गुरुवारी भांडूपच्या एका मॉलमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. शिवाय तिचं अश्लील चित्रिकरणही करण्यात आलं. या प्रकरणी पीडित मुलीनं भांडुप पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केलीय. यात मॉलमधील दोन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.