मुंबई : तुम्ही जर ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवल्याच्या घटना नेहमीच कानावर येत असतात. त्यात भर घालणारी अजून एक घटना समोर येत आहे.
एका व्यक्तीने ५५ हजाराचा आयफोन ऑनलाईन ऑर्डर केला होता. मात्र डिलीव्हरी आल्यानंतर त्यात त्याला ५० रुपयांचा साबण मिळला. त्या व्यक्तीने कंपनी विरोधात धोक्याची केस दाखल केली आहे. कंपनीने देखील या प्रकरणाची तपासणी करण्याचे आश्वासन दिले आहे.
मुंबईत राहणाऱ्या २६ वर्षांचा एका सॉफ्टवेअर इंजिनियरला हा अनुभव आला. त्याने आयफोन ८ फ्लिपकार्ड या नामांकीत वेबसाईटवरून आर्डर केला होता. त्याचबरोबर त्याने पेमेंट देखील केले होते. मात्र त्याला आयफोन न मिळता साबण मिळला. या प्रकरणी या तरुणाने भायखळा पोलिस स्टेशनात तक्रार दाखल केली आहे.
२२ जानेवारीला त्याच्या पनवेलच्या घरी ही डिलिव्हरी आली. मात्र त्यातून मोबाईलऐवजी आयफोन निघाला. भायखळा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिंगटे यांनी याप्रकरणाचा तपास चालू आहे.
आजकाल ऑनलाईन शॉपिंगचे प्रमाण वाढले आहे. मात्र या सुविधांचा लाभ घेताना आपण सतर्क राहणे गरजेचे आहे.