मुंबई : Sambhaji Raje on Maratha Reservation : मराठा समाजाच्या मागण्या साध्या आहेत. फक्त मराठा नाही तर सर्वांना एकत्र घेऊन लढा उभारत आहे. माझा लढा श्रीमंत मराठ्यांसाठी नाही तर गरीब मराठ्यांसाठी आहे. मी आजच आलो नाही 2007 पासून काम करत आहे. समाजाला वेठीस धरू इच्छित नाही एकटाच उपोषणाला बसणार आहे. पुन्हा एकदा नवीन चळवळ उभी राहिली आहे, अशी माहिती खासदार संभाजीराजे यांनी दिली. (Maratha Reservation : Maharashtra Government did not keep its word, therefore fasting till death - Sambhaji Raje)
मागण्या पूर्ण न झाल्याने संभाजीराजे यांनी आमरण उपोषण आझाद मैदानात सुरु केले आहे. शोकडो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होते. छत्रपती संभाजीराजे आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा यावेळी उपस्थित लोक घोषणा देत होते. यावेळी छत्रपती संभाजी राजे यांचे चिरंजीव शहाजी राजे आणि संभाजीराजे यांच्या पत्नी आझाद मैदान इथे आल्या आहेत.
सरकारने शब्द पाळला नाही, त्यामुळे आमरण उपोषण करत आहे. समाजाला वेठीस धरू इच्छित नाही एकटाच उपोषणाला बसणार आहे. शिवाजी महाराज यांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले. फक्त मराठा नाही तर सर्वांना एकत्र घेऊन लढा उभारत आहे. माझा लढा श्रीमंत मराठ्यांसाठी नाही तर गरीब मराठ्यांसाठी आहे. आमच्या मागण्या साध्या आहेत. त्या पूर्ण होऊ शकतात. आरक्षण मिळेल तेव्हा मिळेल. ज्या मागण्या पूर्ण करता येतील त्या तरी पूर्ण करा, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली.
सारथीचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे तो सोडवा. कुंभकोणी काय मुख्यमंत्र्यांना सांगतात ते माहीत नाही. कोपर्डी प्रकरणाचे काय झाले, जे कोणी आंदोलन करतील, त्यांनी शांततेत आंदोलन करावे. कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन यावेळी संभाजीराजे यांनी केले.