आतापर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या... 26-12-2021

वाचा काय आहेत आजचे अपडेट?  

Updated: Dec 26, 2021, 08:48 AM IST
आतापर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या... 26-12-2021 title=

मुंबई : देशात ओमायक्रॉनचं संकट वाढलंय. त्यामुळे 10 जानेवारीपासून कोरोना वॉरियर्सना बुस्टर डोस दिला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर्स तसेच फ्रंट लाइन वर्कर्स यांना कोविड प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस देण्याच्या निर्णयाचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्वागत केले आहे. आणखी काही महत्त्वाच्या बातम्या ... 

1. देशात ओमायक्रॉनचं संकट वाढलंय. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केलं. ओमयाक्रॉनचा धोका वाढला असला घाबरून जाऊ नका, काळजी घ्या. मास्कचा जास्तीत जास्त वापर करा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय. इतकच नाही तर 15 ते 18 वयोगटातल्या मुलांचं 3 जानेवारीपासून लसीकरण सुरू केलं जाईल असंही मोदींनी म्हंटलंय. याशिवाय कोरोना वॉरियर्सनाही बुस्टर डोस दिला जाणारंय. 10 जानेवारीपासून कोरोना वॉरियर्सना बुस्टर डोस दिला जाईल. 

2. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर्स तसेच फ्रंट लाइन वर्कर्स यांना कोविड प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस देण्याच्या निर्णयाचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्वागत केले आहे. राजेश टोपे यांनी 16 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन बूस्टर डोस देण्याची तसेच मुलांना लस देण्याची मागणी केली होती. 

3. मुंबईत सलग चौथ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झालीये. काल दिवसभरात मुंबईत कोरोनाचे 757 नवे रुग्ण आढळून आलेत. दरम्यान शनिवारी कोरोनामुळे एकाही रुग्णाचामृत्यू झालेला नाही.. सध्या मुंबईत 3हजार 703 रुग्ण उपचार घेत आहेत

4. मुंबईत रुग्ण वाढल्यानं कम्युनिटी स्प्रेडची भीती पालिकेला आहे. ओमायक्रॉनचा कम्युनिटी स्प्रेड झालाय का याची पडताळणी पालिका करणार आहे. बाधित मुंबईकरांचीही जिनोम सिक्वेंन्सिंग करणार आहे. ऑगस्टपासून निर्बंध शिथिल झाले.सण साजरे झाले. पण रुग्णवाढ नव्हती. आता चित्र उलट आहे. त्यामुळे पालिका सतर्क झालीय.

5. राज्यात आढळलेल्या ओमायक्रॉनबाधित रुग्णांमधील 95 टक्के रुग्णांनी लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. बाधितांमधील सुमारे 60 टक्के रुग्ण लक्षणं विरहित तर 40 टक्के रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. देशभरात आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक 25 टक्के रुग्ण राज्यात आढळले आहेत.

6. ओमायक्रॉनमुळे अमेरिकेतली विमान सेवा ठप्प झालीय. लुफ्तान्सा, डेल्टा आणि युनायटेड या प्रमुख विमान कंपन्यांनी अनेक उड्डाणं रद्द केलीयत. अनेक विमान कर्मचारी कोरोनाबाधित किंवा क्वारंटिन आहेत. डेल्टा आणि युनायटेड या दोन कंपन्यांची मिळून 100 उड्डाणं रद्द केलीय. 

7. शिर्डीतल्या साईदर्शनासाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या निर्णयानंतर दर्शन व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. सकाळी 6 ते रात्री 9 या कालावधीत  दर्शन मिळणार. जमावबंदीचा आदेश असल्याने रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत दर्शन असणार बंद....

8. एसटी कामगारांच्या संप सुरुच आहे. दरम्यान वाशिम जिल्ह्यातील कारंजा, रिसोड, वाशिम, मंगरूळपीर या चारही आगारातून एकही बस बाहेर पडली नाही.त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाश्यांनासह विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. जिल्ह्यातील चारही आगारातील एकूण 969 कामागरापैकी परिवहन विभागाने आतापर्यंत 187 कर्मचाऱ्या विरुद्ध निलंबनाची कारवाई केलीय.