शेअर बाजारात मोठी उसळी, सेन्सेक्स 50 हजारांवर

शेअर बाजारात (Strong start to the Stock market) मोठी उसळी पाहायला मिळाली. बाजार सुरु (Market Opening) होताच सेन्सेक्स मोठी उसळी दिसून आली.  

Updated: Jan 21, 2021, 10:13 AM IST
शेअर बाजारात मोठी उसळी, सेन्सेक्स 50 हजारांवर
संग्रहित छाया

मुंबई : शेअर बाजारात (Strong start to the Stock market) मोठी उसळी पाहायला मिळाली. बाजार सुरु (Market Opening) होताच सेन्सेक्सची मोठी उसळी दिसून आली. कोरोना लॉकडाऊननंतर प्रथमच एवढी मोठी सेन्सेक्सची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी दिसून आली. सेन्सेक्सने 50 हजारांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे. (Sensex crossing 50,000 for the first time) बाजारात उत्साह दिसून येत आहे. ही बाब गुंतवणूकदारकांसाठी चांगली आहे.

अमेरिकेचे नवे अध्यक्ष जो बायडेन यांच्या शपथविधीनंतर आशियाई बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्सची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी (Nifty also at record highs)दिसून आली असून सेन्सेक्समध्ये २६८ अंशांची उसळी दिसली. सेन्सेक्स 50.061 अंशांवर पोहोचला.(ensex crossing 50,000 for the first time)

सेन्सेक्स पहिल्यांदा 50,000 च्या वर गेला

आज भारतीय बाजारात चांगली सुरुवात झाली आहे, आज सेन्सेक्स 300 अंकांच्या वाढीसह 50,000 च्या पातळीच्या वर गेला आहे. निफ्टीमध्येही 92 अंकांची वाढ दिसून येत असून ते 14730 च्या पातळीच्या वर व्यवहार करीत आहेत. बँक निफ्टीनेही आज एक नवीन विक्रम नोंदविला आहे. बँक निफ्टीने 32,746 च्या विक्रमी पातळीला स्पर्श केला. सध्या निफ्टी  0.5 % च्या मजबुतीबरोबर व्यापार करीत आहे. बायडेन राष्ट्रपती झाल्यानंतर अमेरिकन बाजारपेठेत चांगली तेजी झाल्यानंतर भारतीय बाजारही त्याचा चांगला परिणाम दिसून आला.

सेन्सेक्स पॅकमध्ये बजाज फायनान्स, बजाज फिनझर्व्ह, एचसीएल टेक, बजाज ऑटो, टायटन, आरआयएल, टेक महिंद्रा, कोटक बँक, इंडसइंड बँक, एशियन पेंट, अ‍ॅक्सिस बँक आणि डॉ. रेड्डी यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. यांच्या शेअर 2.61 टक्क्यांपर्यंत वाढलेत. तर दुसरीकडे, टीसीएस, एचडीएफसी, एचडीएफसी बँक आणि नेस्ले यांच्या शेअरमध्ये 0.33 टक्क्यांपर्यंत घसरण झाली.