मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर भेट झाली, या भेटीमागचं कारण अजून गुलदस्त्यात आहे.
ही भेट राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाली असल्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी उद्धव ठाकरे आणि मुंबईत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आले असताना झाली असल्यामुळे या भेटीच्या चर्चेला उधाण आलं आहे.
शिवसेनेवर हा दबाव आणण्याचा प्रयत्न तर नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
मात्र शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोणत्या मुद्यावर बैठक झाली हे अजून स्पष्ट होवू शकलेलं नाही. याबाबतीत भाजप किंवा राष्ट्रवादीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.