शेतकरी नेते आणि मुख्यमंत्री यांच्यातील बैठक संपली

शेतकरी नेते आणि मुख्यमंत्री यांच्यातील बैठक नुकतीच संपली आहे. बैठकीत ८० टक्क्यांपेक्षा जास्त मागण्या मान्य झाल्या असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. मात्र या मागण्या आंदोलक शेतकऱ्यांना किती मान्य होतील, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. 

webmaster Updated: Mar 12, 2018, 04:21 PM IST
शेतकरी नेते आणि मुख्यमंत्री यांच्यातील बैठक संपली title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : शेतकरी नेते आणि मुख्यमंत्री यांच्यातील बैठक नुकतीच संपली आहे. बैठकीत ८० टक्क्यांपेक्षा जास्त मागण्या मान्य झाल्या असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. मात्र या मागण्या आंदोलक शेतकऱ्यांना किती मान्य होतील, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. 

दुसरीकडे आंदोलकांनी लेखी आश्वासन मागितलं आहे. लेखी आश्वासन दिल्याशिवाय मागे हटणार नसल्याचं आंदोलनकांनी म्हटलं आहे.

वन जमिनीच्या बाबतीत येत्या ६ महिन्यात निर्णय घेण्याचं आश्वासन सरकारने दिलं आहे. शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ आणि मंत्रिमंडळाचे प्रतिनिधी यांच्यात ही बातचीत झाली.

जुन्या शिधापत्रिका तीन महिन्याच्या आत बदलून देणार असल्याचं आश्वासन देखील सरकारकडून देण्यात आलं आहे.