मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि देखभालीसाठी हा ब्लॉक घेण्यात येईल. 

Updated: May 20, 2018, 10:32 AM IST
मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक title=

मुंबई : रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि देखभालीसाठी हा ब्लॉक घेण्यात येईल. ठाणे-कल्याण डाउन जलद मार्गावर सकाळी साडेदहा ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ब्लॉक घोषित करण्यात आलाय. या काळात सीएसएमटीवरुन सुटणाऱ्या डाऊन जलद आणि सेमी जलद लोकल निर्धारित थांब्याशिवाय घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड इथं थांबतील. ठाणे, कल्याण स्थानकादरम्यान डाउन धिम्या मार्गावरील लोकल सर्व स्थानकावर थांबतील. तर हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी, सीएसएमटी ते वांद्रे या मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.