आज रात्री 12 पासून मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक

चाकरमान्यांनी आवश्यक नसेल तर प्रवास टाळा 

Updated: Jan 4, 2020, 07:31 AM IST
आज रात्री 12 पासून मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक  title=

मुंबई : देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक असणार आहे. तसेच विद्याविहार ते मुलुंड पादचारी पुलाच्या कामासाठी आज शनिवारी रात्री ट्रॅफीक ब्लॉक असणार आहे. 

चाकरमान्यांची शनिवारी रात्रीपासून देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी होणाऱ्या मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे थोडी गैरसोय होणार आहे. आज रात्रीच्या सुमारास विक्रोळी स्थानकात पादचारी पुलाचा गर्डर उभारण्याकरता रात्री 12 ते पहाटे 5 वाजे पर्यंत ट्राफीक ब्लॉक घेण्यात येईल. तर 6 आणि 7 जानेवारीला पश्चिम रेल्वेवर वांद्रे यार्डामध्ये जम्बोब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे प्रवाश्यांनी वेळेचं नियोजन करूनच घराबाहेर पडणं सोईचं ठरणार आहे. 

कुठे आणि कधी असेल मेगाब्लॉक? 

मध्य रेल्व -  मुलूंड ते माटुंगा दरम्यान 11.30 ते दुपारी 4 या वेळेत मेगाब्लॉक असणार आहे. अप जलद मार्गावर हा मेगाब्लॉक होणार आहे. 

हार्बर रेल्वे - सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे दरम्यान 11.40 ते 4.10 या वेळेत मेगाब्लॉक असणार आहे. अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. 

विक्रोळी पूल काम - विद्याविहार ते कुर्ला दरम्यान शनिवारी रात्री 12 ते रविवारी पहाटे 5 च्या दरम्यान अप जाणाऱ्या रेल्वे जलद असणार असून डाऊन जाणाऱ्या रेल्वे धीम्या असणार आहेत. 

उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी रविवारी, 5 जानेवारी रोजी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच पश्चिम रेल्वेवर 6, 7 जानेवारीला वांद्रे यार्डमध्ये जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. तर विक्रोळी स्थानकात पादचारी पुलाचा गर्डर उभारण्याकरता शनिवारी रात्री ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे.