रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याण आणि कर्जत दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. 

shailesh musale Updated: Apr 8, 2018, 08:59 AM IST
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक  title=

मुंबई : रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याण आणि कर्जत दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. 

हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दु. 4.10 वाजेपर्यंत कुर्ला-वाशी दरम्यान अप-डाऊन मार्गावरील वाहतूक बंद राहिल. पश्चिम रेल्वेवरही सांताक्रुझ ते माहीम दरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11.10 ते दुपारी 3.35 दरम्यान सांताक्रुझ-माहीम स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावरुन चालवल्या जातील.