मुंबई : स्मरणशक्ती हरवलेल्या एका ९० वर्षांच्या वयोवृद्धाला त्यांचे नातेवाईक, सोशल मीडियामुळे पुन्हा भेटू शकले. मुंबईतल्या भायखळा इथले ९० वर्षांचे भिकाजी पानसरे चार महिन्यांपूर्वी हरवले होते. इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर असलेले आणि सध्या स्मरणशक्ती हरवलेले भिकाजी पानसरे, सोलापुरात भीक मागून जगत होते.
नुकताच सोलापुरातल्या एन एम शेख या पोलिसानं भिकाजीला जेवण खाऊ घालतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तो व्हिडिओ पाहून भिकाजी पानसरेंच्या मुलीनं आपल्या वडिलांना ओळखलं आणि त्या सहकुटुंब सोलापुरात दाखल झाल्या. तिथे भिकाजींशी त्यांची भेट होताच, सर्वांनाच अश्रू अनावर झाले. पोलीस कॉन्स्टेबल शेख यानी दाखवलेल्या माणुसकीमुळे वयोवृद्ध भिकाजी पानसरेंना पुन्हा त्यांचं घर आणि नातेवाईक लाभले.