मेट्रो तीन : शिवसेनेचा राज्य सरकार आणि भाजपला दे धक्का

मेट्रो तीनच्या कारशेडसाठी भूखंडाचं आरक्षण बदलाचा प्रस्ताव नामंजूर करत, मुंबई महानगरपालिकेतल्या सत्ताधारी शिवसेनेने राज्य सरकार आणि भाजपला धक्का दिला आहे. 

PTI | Updated: Jun 8, 2017, 07:14 AM IST
मेट्रो तीन : शिवसेनेचा राज्य सरकार आणि भाजपला दे धक्का title=

मुंबई : मेट्रो तीनच्या कारशेडसाठी भूखंडाचं आरक्षण बदलाचा प्रस्ताव नामंजूर करत, मुंबई महानगरपालिकेतल्या सत्ताधारी शिवसेनेने राज्य सरकार आणि भाजपला धक्का दिला आहे. 

मुंबईतल्या गोरेगावमधल्या आरे इथे मेट्रोसाठी कारशेड उभारण्याचं प्रस्तावित आहे. आरेमध्ये मेट्रो कारशेड उभारली जात असलेल्या भूखंडाचं आरक्षण ना विकास क्षेत्रातून विकास क्षेत्रात बदलण्याचा प्रस्ताव, पालिका प्रशासनानं सुधार समितीत आणला होता. त्या प्रस्तावावर चर्चा करण्याची भाजपची मागणी धुडकावून लावत पालिका सत्ताधारी शिवसेनेनं हा प्रस्ताव नामंजूर केला.

मुख्यमंत्र्यांच्या महत्वाकांक्षी मेटो ३ प्रकल्पात शिवसेनेनं अशा प्रकारे अडथळा आणल्याचं बोललं जातंय. प्रशासनाला आता पुन्हा तीन महिन्यानंतर हा प्रस्ताव सुधार समितीसमोर आणावा लागणार आहे. 

दरम्यान शिवसेनेनं हा प्रस्ताव नामंजूर केला असला तरी, आरेमध्ये मेट्रोसाठी कारशेड उभारण्याचं काम सुरुच राहणार आहे.