मुंबईकरांसाठी खूषखबर, दिवाळीपूर्वीच म्हाडाच्या घरांची सोडत

दिवाळीपूर्वीच म्हाडाच्या घरांची सोडत निघणार आहे. तब्बल ११९४ घरांची सोडत काढण्यात येणार आहे.

Updated: Oct 12, 2018, 08:34 PM IST
मुंबईकरांसाठी खूषखबर, दिवाळीपूर्वीच म्हाडाच्या घरांची सोडत

मुंबई : दिवाळीपूर्वीच म्हाडाच्या घरांची सोडत निघणार आहे. तब्बल ११९४ घरांची सोडत काढण्यात येणार आहे. यंदा म्हाडाची घरं अधिक स्वस्त असणार आहे. सर्वच उत्पन्न गटातील घरं रेडी रेकनरच्या दरापेक्षा तब्बल ३० ते सत्तर टक्क्यांनी स्वस्त असणार आहेत. 

मुंबईसह नाशिक, औरंगाबाद, नागपूर या ठिकाणीही म्हाडाची न विकली गेलेली २४४१ घरांची पुन्हा सोडत काढण्यात येणार आहे. या घरांच्या किमतीतही २० ते ४७ टक्के सूट मिळणार आहे. 
 
कोणत्या गटातील घरं किती टक्के स्वस्त असणार आहेत. पाहा हा व्हिडिओ :