MHADA सरळ सेवा भरती परीक्षा अर्जासाठी या तारखेपर्यंत मुदतवाढ

MHADA News : म्हाडातली 565 रिक्त पदे भरण्यासाठी परीक्षेसाठी (MHADA Exam) ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आता मुदतवाढ देण्यात आली आहे.

Updated: Oct 15, 2021, 08:51 AM IST
MHADA सरळ सेवा भरती परीक्षा अर्जासाठी या तारखेपर्यंत मुदतवाढ

मुंबई : MHADA News : म्हाडातली 565 रिक्त पदे भरण्यासाठी परीक्षेसाठी (MHADA Exam) ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आता मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार ऑनलाईन अर्ज 21 ऑक्टोबरपर्यंत भरता येईल. परीक्षा शुल्क भरण्यासाठी 22 ऑक्टोबरची मुदत आहे. परीक्षेसाठी 17 सप्टेंबरपासून अर्ज मागवण्यात आलेत. हे अर्ज म्हाडाच्या (MHADA) संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. (MHADA Recruitment 2021 - Total 565 Posts Online Apply is now extended till 21st October)
 
MHADA भरती प्रक्रियेअंतर्गत स्पर्धात्मक परीक्षेकरिता ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी 21 ऑक्टोबर रात्री 23.59 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. परीक्षा शुल्क भरण्याची मुदत 22 ऑक्टोबर रोजी रात्री 23.59 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 पासून विहित अर्हता धारण केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा म्हाडाच्या संकेतस्थळावर आहे. 

म्हाडाकडून करण्यात येणाऱ्या भरतीमध्ये कार्यकारी अभियंता (स्थापत्य) 13 पदे, उपअभियंता (स्थापत्य) 13 पदे, मिळकत व्यवस्थापक / प्रशासकीय अधिकारी 2 पदे, सहायक अभियंता (स्थापत्य) 30 पदे, सहाय्यक विधी सल्लागार 2 पदे, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 119 पदे, कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक ६ पदे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 44 पदे, सहाय्यक १८ पदे, वरिष्ठ लिपिक 73 पदे, कनिष्ठ लिपिक टंकलेखक 207 पदे, लघुटंकलेखक 20 पदे, भूमापक 11 पदे, अनुरेखकाच्या 7 पदांचा समावेश आहे.  

उमेदवारांनी अधिक माहितीसाठी म्हाडाच्या संकेतस्थळाला भेट द्या. रिक्त पदांचा तपशील प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर आहे. दरम्यान, म्हाडाकडून फसवणूक होण्याच्या पार्श्वभूमीवर आवाहन केले आहे. म्हाडा प्रशासनाने भरतीप्रक्रियेसाठी कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार आणि एजंट म्हणून नेमलेले नाही, असे स्पष्ट केले आहे. म्हाडा भरतीप्रक्रियेबाबत कोणत्याही अनधिकृत व्यक्तींशी कोणतेही आर्थिक व्यवहार करू नये तसेच त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, असेही आवाहन केले आहे.