MHADA घरांसाठी अर्ज करण्यापासून ते पैसे भरण्यापर्यंत, सर्व प्रश्नांची 'येथे'मिळणार उत्तरे

Mhada Webinar: अर्जदारांच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी म्हाडाकडून एका वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Aug 18, 2024, 08:58 AM IST
MHADA घरांसाठी अर्ज करण्यापासून ते पैसे भरण्यापर्यंत, सर्व प्रश्नांची 'येथे'मिळणार उत्तरे  title=
म्हाडा वेबिनार

Mhada Webinar: म्हाडाच्या मुंबई मंडळाने नुकतीच 2 हजार 30 घरांच्या लॉटरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु केली आहे. यामुळे मुंबईत घर घेऊ इच्छिणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. प्रत्येकाला आपल्या बजेटनुसार येथे घर मिळणार आहे. दरम्यान म्हाडा घरांसाठी अर्ज करताना अर्जदारांना अनेक अडचणी येत आहेत. अनेकदा तांत्रिक अडचणी आल्याने अर्ज भरणे राहुने जाते. तसेच वेबसाइटवर कोणती कागदपत्रे अपलोड करायची? याची अनेकांना माहिती नसते. पैसे कधी किती भरायचे? हेदेखील अनेकांना माहिती नसते. तुम्हीदेखील यापैकीच एक आहात? मग आता काळजी करु नका. कारण तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी म्हाडाने पुढाकार घेतलाय. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे

मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतील 2030 घरांच्या विक्रीसाठी इच्छुक असलेल्यांना 9 ऑगस्टपासून अर्ज करता येणार आहे. यासाठी म्हाडाची अधिकृत वेबसाइट https://housing. mhada. gov.in वर जाऊन तुम्हाला अर्ज करता येतो. तसेच तुम्ही मोबाइल अॅपद्वारेदेखील ऑनलाइन अर्ज नोंदणी करु शकता. म्हाडाच्या लॉटरीसाठी नोंदणी केलेल्या अर्जदारांना एसएमएसद्वारे माहिती दिली जाते. असे असताना अनेकांच्या मनात अनेक शंका उपस्थित होतात. अशा अर्जदारांसाठी वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. येथे तुम्हाला अर्ज करण्यापासून ते पैसे भरण्यापर्यंच सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.

कोण घेणार वेबिनार? 

यासाठी तुम्हाला म्हाडाची अधिकृत वेबसाइट https://mhada.gov.in वर वेबिनारच्या लिंकवर क्लिक करावे लागेल. तसेच म्हाडाच्या अधिकृत यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज @mhadaofficial वरही तुम्हाला हे वेबिनार पाहता येणार आहे. संपूर्ण माहिती ऐकल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून येथे तुम्हाला तुमच्या मनातील प्रश्न विचारता येणार आहेत.   या वेबिनारमध्ये मुंबई मंडळाचे उपमुख्य अधिकारी राजेंद्र गायकवाड, म्हाडाच्या  मुख्य माहिती आणि संचार तंत्रज्ञान अधिकारी सविता बोडके, माहिती आणि संचार तंत्रज्ञान अधिकारी संदीप बोदेले उपस्थित असतील. 

घरांच्या लॉटरीसाठी कोणतीही ऑफलालाइन प्रक्रिया नाहीय. तुम्हाला ऑनलाइन माध्यमातून अर्ज भरावे लागतील. त्यामुळे बातमीखाली देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करुन तुम्ही थेट यात सहभागी होऊ शकता.

कधी होणार वेबिनार?

अर्जदारांच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी म्हाडाकडून एका वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. येथे तुम्हाला तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत, यासाठी 19 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता लाइव्ह वेबिनार आयोजित करण्यात आले आहे. 

म्हाडा मुंबई लॉटरी वेबिनारच्या थेट लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा