एमआयएमचं ठरलं.. तीन आमदार महाविकास आघाडी सोबत, या पक्षाला करणार मतदान

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. याबाबत खासदार जलील यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

Updated: Jun 10, 2022, 09:26 AM IST
एमआयएमचं ठरलं.. तीन आमदार महाविकास आघाडी सोबत, या पक्षाला करणार मतदान  title=

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीत अपक्ष आमदार आणि छोट्या पक्षांच्या एकेक मताला महत्व आहे. अशातच एमआयएमच्या तीन आमदार कुणाला मतदान करणार याचा तिढा होता. मात्र, आता हा तिढा सुटला आहे. 

एमआयएमचे ( MIM ) खासदार इम्तियाज जलील ( Imtiaz Jaleel ) यांनी राज्यसभा निवडणुकीत एका पक्षाला जाहीर पाठिंबा दिला आहे. एमआयएमचे आमदार राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान करणार आहेत असं खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विट केलं आहे.

 

हॉटेल ट्रायडेंट येथे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना खासदार इम्तियाज जलिल भेटून गेले. त्यानंतर त्यांनी आज सकाळची हे ट्विट केले आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीला मतदनं करणार आहोत. मात्र त्यांचे आणि आमचे राजकीय आणि वैचारीक मतभेद कायम राहतील असे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे. 

तसेच, त्यांनी दुसऱ्या एका ट्विटमध्ये या निवडणुकीत एमआयएमचे दोन आमदार काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगडी यांना मतदान करणार आहेत. त्यांना आमच्या शुभेच्छा असे म्हटले आहे.