Nawab Malik Arrested | नवाब मलिक यांच्या ट्विटचा रोख कोणाकडे? पाहा सूचक ट्विट

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ईडी कोठडी सुनावल्यानंतर एक सूचक ट्विट (Nawab Malik Tweet) केलं आहे. या ट्विटमुळे पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.  

Updated: Feb 23, 2022, 11:16 PM IST
Nawab Malik Arrested | नवाब मलिक यांच्या ट्विटचा रोख कोणाकडे? पाहा सूचक ट्विट title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणात आजचा संपूर्ण दिवस गाजवला तो महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी. नवाब मलिक यांची ईडीने (Enforcement Directorate) आज जवळपास 7-8 तास चौकशी केली. या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. अटकेनंतर मलिकांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली. ही ईडी कोठडी सुनावल्यानंतर मलिकांनी एक सूचक ट्विट  (Nawab Malik Tweet) केलं आहे. या ट्विटमुळे पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. (minority minister nawab malik tweeted after special pmla court announced ed 8 days custody in money laundering case)
 
ट्विटमध्ये काय म्हटलंय? 

नवाब मलिकांनी एक शाअरी ट्विट केली आहे. "कुछ ही देर की ख़ामोशी है फिर शोर आएगा… तुम्हारा तो सिर्फ वक़्त है हमारा दौर आएगा !!", असं सूचक ट्विट मलिकांनी केलं आहे. या ट्विटद्वारे मलिकांचा रोख हा भाजपकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसेच या ट्विटमधून मलिकांनी भाजप नेत्यांना इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे, असंही काही जणांचं म्हणंन आहे. 

केंद्र-राज्य वाद पेटणार?

नवाब मलिकांना अटक केल्यानंतर ईडी कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे आता पुन्हा केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील वाद येत्या दिवसात आणखी पेटणार असल्याची चिन्हं आहेत.

दरम्यान नवाब मलिक यांना भाजप आणि केंद्र सरकारने मनी लाँड्रिग प्रकरणात गोवलं आहे. तसेच केंद्रीय तपास यंत्रणांचा सूडबुद्धीने वापर करुन मलिकांना अडकवण्याचा हा संपूर्ण प्रयत्न आहे, असं महाविकास आघाडीचं म्हणंन आहे. या कारवाईविरोधात महाविकास आघाडी उद्या (24 फेब्रुवारी) भाजपविरोधात आंदोलन करणार आहे.