मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर सिद्धीविनायकाच्या चरणी

मिस वर्ल्ड बनून देशात परतलेल्या मानूषी छिल्लरचं मुंबईत जोरदार स्वागत झालं. मिस वर्ल्ड 2017 मानुषीने भारतात पोहोचताच देशवासियांचे आणि चाहत्यांचे आभार मानले. सोमवारी सकाळी ती सिद्धीविनायक मंदिरात पोहोचली आणि गणपतीचे दर्शन घेतले.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Nov 27, 2017, 01:01 PM IST
मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर सिद्धीविनायकाच्या चरणी title=

नवी दिल्ली : मिस वर्ल्ड बनून देशात परतलेल्या मानूषी छिल्लरचं मुंबईत जोरदार स्वागत झालं. मिस वर्ल्ड 2017 मानुषीने भारतात पोहोचताच देशवासियांचे आणि चाहत्यांचे आभार मानले. सोमवारी सकाळी ती सिद्धीविनायक मंदिरात पोहोचली आणि गणपतीचे दर्शन घेतले.

मानूषी छिल्लर तिच्या कुटुंबासह सिद्धीविनायक मंदिरमध्ये पोहचली. तिच्या सोबत तिचे माता-पिता आणि लहान भाऊ होता. सोमवारी सकाळी तिने बाप्पांची पहिली आरती केली. संपूर्ण कुटुंबाने मानूषीच्या या यशासाठी बाप्पांचे आभार मानले.

हरियाणातील या 20 वर्षीय मेडिकलच्या विद्यार्थिनीने चीनमध्ये 17 वर्षांनंतर भारताकडून हा खिताब मिळवला. मुंबईत पोहचल्यावर, छिल्लर म्हणाली की, 'हे माझ्यासाठी अतिशय भावनिक क्षण होते. मी आपल्या समर्थनाबद्दल कृतज्ञ आहे. तुमचं सर्व प्रेम मला दिल्यामुळे धन्यवाद.' शनिवारी रात्री मुंबईत आगमन झाल्यानंतर मानुषी छिल्लरचं जोरदार स्वागत झालं.