मुंबई : महाविकासआघाडी सरकारमधून बाहेर पडल्यानंतर तब्बल 11 दिवसांनंतर शिंदे गटाचे आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. आता सर्व आमदार मुंबई विमानतळावरून ताज प्रेसिडेंटकडे रवाना झाले आहेत. मुंबई विमानतळावर यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. आज शिंदे गट आणि भाजपची संयुक्त बैठक पार पडणार आहे.
एकनाथ शिंदे समर्थक आमदार आज गोव्यातून मुंबईत दाखल झाल्यानंतर एका बसने सर्व आमदार हॉटेलकडे रवाना झाले. यावेळी बस मधून उतरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित समर्थकांना हात दाखवून त्यांचे आभार मानले. एकनाथ शिंदे गट आणि भाजपची आज एकत्र बैठक होत आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील हॉटेलवर दाखल झाले आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्व आमदारांना संबोधित करणार असून सरकारची पुढील दिशा सांगणार आहेत.
एकनाथ शिंदे यांच्याकडे जवळपास 50 आमदारांचं समर्थन होतं. त्यामुळे त्यांनी भाजपसोबत जात सरकार स्थापन केलंय. लवकरच या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.