मुंबई : चेंबूर, विक्रोळी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर करण्यात आली आहे. मृतांच्या नातेवाईकांना केंद्राकडून 2 लाख रूपयांची मदत जाहीर करण्यात आली. पावसामुळे मुंबईच्या चेंबूर आणि विक्रोळी भागामध्ये झालेल्या दुर्घटनांमुळे आत्तापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला. केंद्र सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निधीमधून २ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
Maharashtra CM Uddhav Thackeray has expressed grief over the deaths in accidents at Chembur & Vikhroli due to torrential rains & announced that the government would pay Rs 5 lakh each to the heirs of the deceased & free treatment would be given to the injured: CMO
— ANI (@ANI) July 18, 2021
त्यासोबतच, या दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींना मोफत उपचार देण्याची घोषणा राज्याने केली. राज्या आणि केंद्र सरकारने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही मदत जाहीर केली.
रविवारची सकाळ मुंबईकरांसाठी अत्यंत धक्कादायक ठरली आहे, विक्रोळी, चेंबूरमध्ये भिंत कोसळ्यामुळे आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी अद्यापही शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. विक्रोळी सुर्यनगर परिसरामध्ये तीन ते चार घरांवर दरड कोसळली आहे तर पावसामुळे चेंबूरच्या भारत नगर भागातील झोपडपट्टीत भिंत कोसळली आहे.