मनसेने महापलिका मुख्यालयातून गाशा गुंडाळला

मनसेला महापलिका मुख्यालयातून आपला गाशा गुंडाळला लागला आहे. मनसेला पक्ष कार्यालय बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.

Updated: Jan 31, 2018, 11:15 PM IST
मनसेने महापलिका मुख्यालयातून गाशा गुंडाळला title=

मुंबई : मनसेला महापलिका मुख्यालयातून आपला गाशा गुंडाळला लागला आहे. मनसेला पक्ष कार्यालय बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.

कर्मचाऱ्यांनाही कामावरुन कमी  केले

तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांनाही कामावरून कमी करण्यात आले आहे. यापुढे दररोज कार्यालय उघडले जाणार नाही, अशी माहिती पक्षाचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांनी दिली. मनसेतून शिवसेनेत पक्षांतर केलेल्या ६ नगरसेवकांच्या गटाला कोकण विभागीय आयुक्तांनी दिली आहे मान्यता. त्यामुळे महापालिकेत मनसेचा फक्त एक नगरसेवक आहे.

कार्यालय बंद करण्याचा मनसेचा निर्णय

यापुढे रोज कार्यालय उघडणे आणि कामकाज करणे शक्य नसल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे संजय तुर्डे यांनी सांगितले.कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीसाठी  प्रयत्न करणार असल्याची मा्हिती, संजय तुर्डे यांनी दिली. महापालिका मुख्यालयात कार्यालयासाठी पक्षाचे किमान पाच नगरसेवक असणे आवश्यक. पण महापालिकेनं कार्यालय सोडण्यासाठी मनसेला अद्याप अधिकृतपणे काही कळवलेले नाही. मनसे नगरसेवक संजय तुर्डे यांनी स्वतःहून हा निर्णय घेतला आहे.

पालिकेकडून अद्याप नोटीस नाही!

पक्षांतर केलेल्या ६ नगरसेवकांच्या गटाला मान्यता देण्यात आली असली तरी, त्या नगरसेवकांना अपात्र ठरविण्यात यावे या मनसेच्या याचिकेवर अद्याप निर्णय आलेला नाही. त्यामुळे महापालिका चिटणीस विभागाने अद्याप मनसेकडून कार्यालय काढून घेतलेलं नाही.