मुंबई : राज ठाकरे आपला लाडका श्वान 'जेम्स'च्या निधनाने भावूक झाले आहेत. राज ठाकरे यांच्या 'जेम्स' नावाच्या श्वानाचे सोमवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. राज ठाकरे हे श्वान प्रेमी असल्याचा सर्वश्रुत आहेत. अगदी जवळच्या श्वानाच्या निधनाने राज ठाकरेंवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ग्रेट डेन प्रजातीचा जेम्सही अनेक वर्ष त्यांच्यासोबत होता. परंतु वयोमानानुसार जेम्सने काल अखेरचा श्वास घेतला. लाडक्या कुत्र्याच्या निधनाने राज ठाकरेंना धक्का बसला आहे.
जेम्ससोबत राज ठाकरे यांचे तरुणपणातील अनेक फोटो याआधी समोर आलेले आहेत. राज ठाकरेंना जेम्सचा विशेष लळा होता. अनेक ठिकाणी ते जेम्सला सोबत घेऊन जात. (धक्कादायक! राज ठाकरेंवर कोसळला दुःखाचा डोंगर)
राज ठाकरे यांच्याकडे एकूण तीन ग्रेट डेन होते. त्यापैकी बॉन्ड आणि शॉन आधी गेले, तर आता जेम्सही गेला. त्यामुळे राज ठाकरे अधिकच भावूक झाले आहेत.
राज ठाकरे कुटुंबियांकडे आता ही विविध प्रजातींची सहा पाळीव श्वान आहेत. यातील 'जेम्स' या श्वानाचं निधन झालं आहे.
26 डिसेंबर 2018 रोजी राज ठाकरे यांच्या लाडक्या कुत्र्याचं निधन झालं होतं. साडेबारा वर्षांपासून राज ठाकरेंसोबत असलेल्या 'बॉण्ड'चं निधन झालं. राज ठाकरे यांनी स्वतः त्यावेळी बॉण्डला परळच्या स्मशानभूमीत अखेरचा निरोप दिला आहे.