राज ठाकरेंना न ओळखणा-या वॉचमनला मनसेच्या महिला कार्यकर्तीकडून चोप : VIDEO

राज ठाकरेंच्या नावाखाली खंडणी मागणारी टोळी गजाआड

Updated: Oct 17, 2021, 01:26 PM IST
राज ठाकरेंना न ओळखणा-या वॉचमनला  मनसेच्या महिला कार्यकर्तीकडून चोप : VIDEO

मुंबई : राज ठाकरेंना न ओळखणा-या वॉचमनला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मारहाण करणारी महिला अभिनेत्री असल्याचं समोर आलं आहे. ही महिला शुटिंगचं लोकेशन पाहण्यासाठी मालाडच्या मढमध्ये गेली होती. त्यावेळी वॉचमनशी बोलत होती. वॉचमननेे राज ठाकरेंना ओळखत नसल्याचं म्हणताच तिने मारहाण केली.

या कार्यकर्त्यांनी मारहाण करून पैसे मागितल्याचा आरोप वॉचमन दयानंद गौडनं केला आहे. या प्रकरणात डायरेक्टर आणि ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे. तर मारहाण करणा-या अभिनेत्री आणि कार्यकर्त्यांना नोटीस दिली आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाने खंडणी मागण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल होताच मालवणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे अटक करण्यात आलेल्यांमध्ये सिनेसृष्टीतील तिघांचा समावेश आहे. या घटनेच्या संदर्भातील एक व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.