आतापर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या | 17-12-2021

वाचा आतापर्यंतच्या घडामोडी आणि राहा अपडेट   

Updated: Dec 17, 2021, 08:42 AM IST
आतापर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या | 17-12-2021 title=

मुंबई : आतापर्यंतच्या ताज्या घडामोडी... वर्ष संपत असताना  थर्टी फर्स्टसाठी नव्या निर्बंधांसाठी मोठा निर्णय... ओमायक्रॉनच्या रूग्ण संख्येत वाढ... मुंबईत 16  डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत कलम 144 लागू करण्यात आलंय... आणखी काही महत्त्वाच्या बातम्या खालील प्रमाणे...

1. देशभरातल्या ओमायक्रॉनबाधितांचा आकडा 87 वर गेलाय. कर्नाटक, तेलंगणा, दिल्ली आणि गुजरातमध्ये गुरूवारी एका दिवसात 14रुग्ण वाढले. तर महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे सध्या 32रुग्ण आहेत. तर त्या खालोखाल राजस्थानात 17 ओमायक्रॉन बाधित आहेत. देशभरात गुरुवारी सुमारे 8हजार कोरोनारुग्ण वाढलेयत. तर ऍक्टिव्ह रुग्ण आहेत 87हजार.... ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी आढावा घेतला. केंद्रशासीत प्रदेशातल्या आरोग्यसुविधांचीही माहिती घेतली. 

2. कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन या नवीन व्हेरिएंटचा वाढता धोका लक्षात घेऊन मुंबईत 16  डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत कलम 144 लागू करण्यात आलंय...ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आणि कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजनांचा एक भाग म्हणून शहरात मोठ्या मेळाव्यावर बंदी लागू राहील. त्यामुळे मुंबईत 31 डिसेंबर पर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आली आहे. 

3. कोरोनाकाळातली गैरहजेरी बेस्ट कर्मचा-यांना भोवलीय. 2020मध्ये कोरोना काळात कर्तव्यावर हजर नसलेल्या 11हजार कर्मचा-यांची वेतनकपात होणार आहे. नोव्हेंबरच्या पगारापासून कपात सुरु झालीय. पहिल्या लॉकडाऊनमध्ये लोकल ट्रेनही बंद होत्या. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतल्य़ा कर्मचा-यांच्या वाहतुकीची पूर्ण जबाबदारी बेस्टवर होती. त्यावेळी गैरहजर कर्मचा-यांना नोटिसा बजावल्या. त्यानंतर कर्मचारी सेवेत रुजु झाले. पण आता त्यांच्यावर कारवाई होतेय. 

4. पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाल्याने मोदी सरकारने मोठा निर्णय घेतलाय...यामुळे पेट्रोल पुन्हा स्वस्त होणाराय...सरकारने इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रमांतर्गत इथेनॉलवरील GST दर 18% वरून 5% पर्यंत कमी केलाय...पेट्रोलमध्ये मिश्रणासाठी वापरण्यात येणा-या इथेनॉलवरील जीएसटीत सरकारने 13 टक्क्यांची कपात केलीय...त्यामुळे पेट्रोल स्वस्त होण्याची शक्यता आहे...इथेनॉलचा वापर वाढण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने धोरणात्मक पाऊल उचलल्याचं मंत्री तेली यांनी सांगितलं...

5. दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांच्या तारखा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केल्यात. त्यानुसार 4 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीत बारावीची लेखी परीक्षा होणाराय... तर दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल या कालावधीत पार पडणाराय... यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार आहेत. प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर जाऊनच विद्यार्थ्यांना परीक्षा द्याव्या लागणार आहेत.

6. ठाणे-दीवा पाचव्या, सहाव्या मार्गासाठी रविवारी 18तासांचा ब्लॉक असेल. सकाळी 8ते मध्यरात्री 2वाजेपर्यंत ब्लॉकची वेळ असेलं. मध्य रेल्वेचे मुख्य सुरक्षा आयुक्त आज या कामाची पाहणी करणारयत. त्यांच्या मंजुरीनंतर रविवारी मेगाब्लॉक घेतला जाईल. दहा वर्षांपासून हे काम सुरु आहे.