MPSC Exam | एमपीएससीने मुख्य परीक्षा पुढे ढकलली, नक्की कारण काय?

एमपीएससीच्या (Maharashtra Public Service Commission) विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. 

Updated: Jan 27, 2022, 10:06 PM IST
MPSC Exam | एमपीएससीने मुख्य परीक्षा पुढे ढकलली, नक्की कारण काय? title=

पुणे : एमपीएससीच्या (Maharashtra Public Service Commission) विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. राज्य लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षा (Mpsc Main Exam) पुढे ढकलली आहे. आयोगाने गट ब विभागाची परीक्षा न्यायालयीन कारणामुळे पुढे ढकलली आहे. आयोगाने परिपत्रक काढत याबाबतची माहिती दिली आहे. ही मुख्य परीक्षा 29 आणि 30 जानेवारीला पार पडणार होती.  (mpsc maharashtra public service commission has postponed group b main exam due to court reasons)

नक्की प्रकरण काय?

ज्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षा देता आली नाही, त्या विद्यार्थ्यांनी ही याचिका दाखल केली. ही सुनावणी पूर्व परीक्षा गट ब साठी असणार आहे.  मुख्य परीक्षा देण्याची संधी आम्हालाही देण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांची आहे. या याचिकेवर 2 फेब्रुवारीला होणार आहे. या सुनावणीत न्यायालय काय निर्णय देतं याकडे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच लक्ष लागून राहिलं आहे.