महाराष्ट्रातल्या जनतेला शॉक! महावितरणने केली वीज बिलात वाढ

महागाईने होरपळलेल्या जनतेला वीज बिल वाढीचा शॉक

Updated: Jul 8, 2022, 08:10 PM IST
महाराष्ट्रातल्या जनतेला शॉक! महावितरणने केली वीज बिलात वाढ title=

Raises Electricity Bill : आत्ता महाराष्ट्राच्या जनतेला शॉक देणारी बातमी. महावितरणनं पुन्हा एकदा वीज बिलात वाढ केलीय. महावितरणंनं इंधन समायोजन आकार म्हणजे FACमध्ये मोठी वाढ केलीय. त्यामुळे यापुढे ग्राहकांना वीज बिलात मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

कोळसा आणि इंधनाचे दर वाढल्यानंतर इंधन समायोजन आकारामध्ये महावितरण वाढ करत असते. त्याला MERC यांची परवानगी असते.  जून महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत जो इंधन समायोजन आकार आहे त्यामध्ये प्रचंड वाढ झालीय. मार्च 2022 ते मे 2022 पर्यंत जो इंधन समायोजन आकार होता त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने सध्याचा FAC वाढवला आहे. याचा थेट फटका राज्यातल्या ग्राहकांना बसणार आहे.

आधीचा इंधन समायोजन आकार

0 ते 100 युनिट आधी 10 पैसे आता 65 पैसे

101 ते 300 युनिट आधी 20 पैसे आता 1रुपये 45 पैसे

301 ते 500 युनिट आधी 25 पैसे आणि आता 2 रुपये 05 पैसे

501 युनिटच्या वर आधी 25 पैसे आता 2 रुपये 35 पैसे FAC आकारला जाणार आहे....