Isha Ambani Twins First Pic : जगासाठी Businessman नातवंडांसाठी मात्र आजोबा; लेकीच्या जुळ्या मुलांसोबत Mukesh Ambani यांचा गोड फोटो व्हायरल

Isha Ambani Baby : आशिया आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची लेक ईशा अंबानीला जुळी मुलं झाली. त्यानंतर घरात आनंदाचं वातावरण आहे. या छोट्या राजकुमारी आणि राजकुमाराचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Updated: Feb 3, 2023, 11:28 AM IST
 Isha Ambani Twins First Pic : जगासाठी Businessman नातवंडांसाठी मात्र आजोबा; लेकीच्या जुळ्या मुलांसोबत Mukesh Ambani यांचा गोड फोटो व्हायरल title=
Mukesh Ambani and Nita Ambani daughter isha ambani twins first picture viral on Social media Anant Ambani Radhika Merchant Engagement

Isha Ambani twins Aadiya and Krishna : आशियातील श्रीमंत आणि भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांची मुलगी ईशा अंबानी (Isha Ambani) हिने नुकतेच जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. अंबानी कुटुंबात सध्या आनंदच आनंद आहे. ईशा अंबानी हिला जुळी मुलं झाली त्यानंतर धाकट्या मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट (Anant Ambani - Radhika Merchant) यांचा सारखपुडा...आता तिसरी जबरदस्त बातमी म्हणजे गौतम अदानी (Gauam Adani)  यांना जोरदार धक्का देत आशिया आणि भारतातील श्रीमत व्यक्ती ठरले आहेत. सोशल मीडियावर या कुटुंबाबद्दल काही ना काही व्हायरल होतं असतं. कधी त्यांची संपत्ती तर कधी, त्यांचा घराचे फोटो...या कुटुंबाबद्दल जाणून घ्यायला सर्वसामान्यांना खूप आवडतं. ते गुगलवर त्यांचा बद्दल अनेक गोष्टी सर्च करत असतात. पण सध्या या घरातील फेमस व्यक्ती आहे ते म्हणजे राधिका आणि ईशाची मुलं...या राजकुमार आणि राजकुमारीची पहिली झलक पाहिला मिळाली आहे. 

जगासाठी Businessman नातवंडांसाठी मात्र आजोबा

सोशल मीडियावर लेकीच्या जुळ्या मुलांसोबत Mukesh Ambani यांचा गोड फोटो व्हायरल झाला आहे. जगालाठी ते प्रसिद्ध उद्योगपती असले तरी नातवंडांसाठी ते एक आजोबा आहेत. पैशांमध्ये खेळणारे मुकेश अंबानी त्यांचा स्वभावाने...त्यांचा वागण्यातून त्यांनी सर्वसामान्यांची मनं जिंकली आहेत. आदिया (Aadiya) आणि कृष्णा (Krishna) सोबत खेळाताना आजोबा दिसतं आहेत. (Mukesh Ambani and Nita Ambani daughter isha ambani twins first picture viral on Social media Anant Ambani Radhika Merchant Engagement )

ईशा अंबानीच्या जुळ्या मुलांचा पहिला फोटो

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या सारखपुड्यातील हा फोटो आहे. या फोटोत आजोबांनी आदियाला धरलं आहे. तर अजून एका व्यक्तीने कृष्णा धरल्याचं दिसतं आहे. या फोटोमध्ये दोघांनी मॅचिंग आणि पारंपरिक कपडे घातले आहे. या दोघा गोंडस मुलांना पाहून एकच वाक्य निघतं सो क्यूट...

हा फोटो अंबानी कुटुंबाच्या एका फॅन पेजने पोस्ट केला आहे. 19 डिसेंबर 2022 ला ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांना जुळी मुलं झाली. जेव्हा ही मुलं मुंबईत आली तेव्हा त्यांचा स्वागतासाठी भव्य तयारी करण्यात आली होती. देशभरातील पुजाऱ्यांनी तिच्यासाठी खास पूजा केली होती.