मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांचा परिवार वेगवेगळ्या कारणावरून नेहमी चर्चेत असतो. त्यांचे उत्पन्न, राहण्याची जागा, लाईफस्टाईल अशा वेगवेगळ्या गोष्टी सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. मुकेश अंबांनी यांच्या घरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यासंबंधी अशीच एक गोष्ट सध्या व्हायरल होत आहे.
भारतातील सर्वात मोठ्या घरांमध्ये मुकेश अंबानींच्या अॅंटीलिया या घराचे नाव घेतले जाते. २७ मजली या इमारतीत ६०० नोकर घरात काम करीत असतात. घरातील प्रत्येक वस्तू स्पेशल असावी, यासाठी या कर्मचाऱ्यांचा अट्टाहास असतो. पण सध्या मुकेश अंबानींच्या घरात निर्माण होणाऱ्या, कचऱ्याचे ते काय करतात ? ही बाब सध्या चर्चेत आहे.
मुकेश अंबांनी यांच्या घरात निर्माण होणारा कचरा फेकला जात नाही, तर याचा उपयोग वीज निर्माण करण्यासाठी केला जातो. कचऱ्यातून वीज निर्माण होण्यासाठी त्यांच्या घरात एक खास यंत्रणा तयार केली आहे.
यामध्ये सुका कचरा आणि ओला कचरा, असे दोन वेगळे भाग केले जातात. या वेगळ्या केलेल्या कचऱ्याचा उपयोग वीज निर्मितीसाठी केला जातो. अॅंटीलिया हाऊस लागणारी वीज, ही या कचऱ्यातून निर्माण झालेली असते, असेही सांगितले जाते.
* या घरामध्ये १६८ गाड्या पार्क करण्याची जागा आहे.
* अॅंटीलियाच्या टेरेस्टवर तीन हेलिपॅड आहेत.
* या महलात एक स्विमिंग पूल आणि स्पा रूमही आहे.
* घरात एसीची गरज भासत नाही, कारण लागणारे तापमान घर स्वतःच ठरवू शकते अशी यंत्रणा काम करते.
* मुकेश अंबानी यांच्याकडे स्वत:च्या मालकीची एक एअरबसही आहे.