मुंबई : मुंबईतील कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाला लक्षात घेता, त्याला रोखण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन लावला गेला आहे आणि लोकांच्या संचारावर बंदी घालण्यात आली आहे. परंतु या सगळ्यामध्ये याच्या संचारावर बंदी घालण्याची हिंमत कोणीच करु शकणार नाही. याला तर पोलिसांची भीती देखील नाही. आता तुम्ही विचार कराल पोलिसांना न घाबरणारा किंवा बेधडक रस्त्यावर फिरणारा हा व्यक्ती आहे तरी कोण? हा काय कोणत्या मोठ्या अधिकाऱ्याचा किंवा कोणत्या आमदाराचा वैगरे मुलगा आहे का? ज्याला पोलिस ही थांबवू शकणार नाही.
परंतु हा कोणीही व्यक्ती नसून हा बिबट्या आहे. आता याला कोणी थांबवू शकणार आहे का? तो त्याच्या मनाचा राजा हवे तिकडे फिरु शकतो. शुक्रवारी तो गोरेगावमधील रिहायशी कॉलोनीमध्ये फेर फटका मारायला आला. लॉकडाऊनमूळे रस्त्यांवर लोकांची गर्दी नसल्याने, हा बिबट्या जंगलातून बाहेर येऊन माणसांच्या वस्तीत घुसला.
#WATCH | A leopard was spotted in a resident colony in Goregaon area of Mumbai, Maharashtra early morning yesterday. pic.twitter.com/0jFFpWE3xb
— ANI (@ANI) May 28, 2021
बिबट्या या रिहायशी कॉलोनीमधील एका बिल्डींगच्या पार्किगमध्ये फिरत असतानाचे दृश्य पार्किंगच्या CCTV कॅमेरात कैद झाले आहे. या बातमीनंतर परीसरात एकच खळबळ उडाली आहे. त्याने कोणावरही हल्ला केल्याची किंवा कोणी जखमी झाल्याची बातमी अद्याप तरी समोर आलेली नाही. परंतु सध्या हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि बिबट्याला पाहून थरार अनुभवत आहेत.