मुंबई : अल्पवयीन मुलीचा सलग १८ महिने लैंगिक छळ; ६ जण ताब्यात

अश्लिल चित्रफीत काढून केला लैंगिक छळ, तीन आरोपी अद्याप फरार आहेत.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Feb 5, 2018, 09:06 AM IST
मुंबई : अल्पवयीन मुलीचा सलग १८ महिने लैंगिक छळ; ६ जण ताब्यात

मुंबई : १५ वर्षीय मुलीचा सलग १८ महिने अनन्वीत लैंगिक छळ झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ही घटना राजधानी मुंबईतील विले पार्ले या नामांकीत परिसरातील असून, पोलिसांनी या प्रकरणात ६ जणांना ताब्यात घेतले आहे. तर, तीन आरोपी अद्याप फरार आहेत.

पास्को कायद्यानुसार गुन्हा दाखल

प्राप्त माहितीनुसार, या प्रकरणात तब्यात घेण्यात आलेले सर्व आरोपी साधारण १८ ते २० या वयोगटातील आहेत. यात एका राजकीय पक्षाच्या ३० वर्षी यूवा अध्यक्षाचाही समावेश असल्याचे समजते. झोन ८मधील डीसीपी अनिल कुंभारे यांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार सर्व आरोपींवर भा.दं.सं. ३७६,३६३, पास्को कायदा कलम ४,८,५०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ही कारवाई रविवारी केली.

अश्लिल चित्रफीत काढून केला लैंगिक छळ

घटनेबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, आरोपींनी साधारण १८ महिन्यांपूर्वी पीडितेला आपल्या घरी बोलावले. तिला अश्लिल चित्रफीती दाखवत तिच्यासोबत शरीरसंबंध केला. आरोपींनी मोबाईलच्या सहाय्याने पीडितेची अश्लिल चित्रफीतही बनवली. तसेच, या चित्रफीतीच्या आधारे ब्लॅंगमेल करत एका पाठोपाठ एक अशा नऊ आरोपींनी तिचा लैंगिक छळ वारंवार केला.

पीडिता गेली घरातून पळून

वारंवार घडणाऱ्या या प्रकाराचा धसका घेत पीडिता घरातून पळून गेली. मात्र, काही दिवसांनी ती पुन्हा घरी परतली. आरोपींनी ती घरी परतताच पुन्हा तिच्याशी गैरवर्तन केले. त्यामुळे पीडितेने घडल्या प्रकाराची माहिती आपल्या आईला दिली. त्यानंतर शनिवारी रात्री झालेल्या तक्रारीनुसार तपास करत पोलिसांनी आरोपींना रविवारी अटक केली.