मुंबईत उड्डाणपुलाचा काही भाग कोसळून 14 मजूर जखमी

 बीकेसीमधल्या उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला. उड्डाणपुलाचं काम चालू असताना ही दुर्घटना पहाटे घडली.  

Updated: Sep 17, 2021, 12:11 PM IST
मुंबईत उड्डाणपुलाचा काही भाग कोसळून 14 मजूर जखमी title=

मुंबई : शहरातील बीकेसीमधल्या उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला. उड्डाणपुलाचं काम चालू असताना ही दुर्घटना पहाटे घडली. या दुर्घटनेत 14 मजूर जखमी झालेत. घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस पोहोचले आहेत. (Mumbai: A portion of under-construction flyover connecting BKC main road and Santa Cruz–Chembur Link Road collapsed)

मुंबई: निर्माणाधीन पुल का हिस्सा गिरा, हादसे में 13 मजदूर घायल; मलबे में कई लोगों के दबे होने की आशंका

मुंबईतल्या बांद्रा कुर्ला कॉम्पेक्स भागात काम चालू असलेल्या उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला. य़ा दुर्घटनेत तेरा मजूर जखमी झाल्याने या मजुरांना जवळच्या बीएन देसाई रुग्णालायात उपचारासाठी हलविण्यात आले. पहाटे साडेचार वाजता ही दुर्घटना घडली. ही घटना कशी घडली याचा तपास सुरू आहे. दुर्घटना घडली तेव्हा उड्डाणपुलाचे काम करण्यासाठी 22 मजूर उपस्थित असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मुंबईतील बीकेसी मुख्य रस्ता आणि सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडला जोडणाऱ्या  उड्डाणपुलाचा ( flyover) एक भाग पहाटे साडेचारच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत 14 जण किरकोळ जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. कोणतीही जीवितहानी नाही आणि कोणतीही व्यक्ती बेपत्ता नाही, अशी माहिती मुंबई झोन 8 चे डीसीपी मंजुनाथ सिंगे (Manjunath Singe) यांनी दिली, असे वृत्त एएनआयने दिलेय.