मुंबई : मुंबईकरांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी आहे. रविवारी तांत्रिक कारणांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी तिन्ही मार्गांवर आणि मुंबई उपनगरात मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉकचं शेड्युल कसं असणार आणि कुठे-कुठे असणार जाणून घेऊया.
मुंबईसह उपनगरात राहणाऱ्या नागरिकांनी मेगाब्लॉकचं शेड्युल पाहूनच बाहेर पडा. कारण उद्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉग 9.30 पासून 5 पर्यंत असणार आहे.
मध्य रेल्वे- मेगाब्लॉक वेळ 10.55 ते दुपारी 3.55
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -विद्याविहार अप आणि धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. डाउन धीम्या मार्गावरील गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. मशीद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड, विद्याविहार स्थानकांवर थांबणार नाहीत.
हार्बर मार्ग- मेगाब्लॉक वेळ 11.05 ते संध्याकाळी 4.05
पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर हा मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील लोकल या काळात रद्द करण्यात आल्या आहेत.
ठाणे-वाशी/नेरुळ आणि बेलापूर/नेरुळ-खारकोपर मार्गावरील लोकल सेवा रविवारच्या वेळापत्रकानुसार चालू असणार आहे. या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार नाही. ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावर 10 ते दुपारी 3.20 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान लोकल धावणार नाही.
ठाणे - वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावरून लोकल सेवा सुरू असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशीसाठी विशेष लोकल सेवा असणार आहे. नागरिकांनी मेगाब्लॉकचं वेळापत्रक पाहून बाहेर पडावं असं आवाहन करण्यात आलं आहे.