मुंबईत खवय्यांसाठी बिर्याणी फेस्टिवलचं आयोजन

मुंबईतल्या जोगेश्वरी पूर्व इथे एकाच ठिकाणी विविध प्रकारच्या बिर्याणींची चव चाखण्याची संधी उपलब्ध झाली. चला तर मग कोण कोणत्या प्रकारच्या बिर्याणी इथे मिळतायेत ते पाहुयात...

Updated: Apr 8, 2018, 11:11 PM IST
मुंबईत खवय्यांसाठी बिर्याणी फेस्टिवलचं आयोजन title=

गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई : मुंबईतल्या जोगेश्वरी पूर्व इथे एकाच ठिकाणी विविध प्रकारच्या बिर्याणींची चव चाखण्याची संधी उपलब्ध झाली. चला तर मग कोण कोणत्या प्रकारच्या बिर्याणी इथे मिळतायेत ते पाहुयात...

शाकाहारी असो की मांसाहारी.... बिर्याणी म्हटलं की, प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतंच. अशा बिर्याणी प्रेमींसाठी जोगेश्वरीत खास बिर्याणी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये व्हेज बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटण बिर्याणी, अंडा बिर्याणी, कोळंबी बिर्याणी, हैदराबादी बिर्याणी, दम बिर्याणी, काश्मिरी बिर्याणी, मराठा बिर्याणी असे विविध प्रकार होते. 

मुघलांनी बिर्याणी हा पदार्थ भारतात आणला. असंख्य प्रकारच्या या बिर्याणीला दर्दी खवय्यांची चांगलीच पसंती मिळाली.

इथल्या स्वादिष्ट बिर्याणीवर यथेच्छ ताव मारुन, शौकीन खवय्यांचं पोट भरलं आणि मनही तृप्त झालं.

बिर्याणीने खवय्यांचं पोट भरलं, मनही तृप्त