मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्यावाढीविषयी महत्त्वाची बातमी

रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता.... 

Updated: Jun 18, 2020, 08:37 PM IST
मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्यावाढीविषयी महत्त्वाची बातमी  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : जवळपास तीन महिन्यांपासून सुरु असणारं कोरोना व्हायरसचं थैमान दिवसागणिक वाढतच चाललं आहे. पण, यातही अतिशय झपाट्यानं पसरणाऱ्या या विषाणूच्या प्रादुर्भावातून सावरण्याऱ्यांची संख्या काही अंशी दिलासा देऊन जात आहे. 

मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत भरत पडत असली तरीही याबाबतची महत्त्वाची माहिती सध्या समोर आली आहे. गुरुवारी शहरात कोरोना व्हायरचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आणखी वाढून आता 30 दिवसांवर तर, रूग्ण वाढीचा सरासरी दर आणखी कमी होऊन आता 2.30% वर पोहोचला आहे. 

एच पूर्व मध्ये रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून आता तब्बल 64 दिवसांवर पोहोचला तर रूग्ण वाढीचा सरासरी दर 1.1% असा सर्वात कमी असल्याची माहिती मिळत आहे. 

 

एफ उत्तर वॉर्डमध्येही रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आणखी वाढून आता 62 दिवसांवर पोहोचला असून रूग्ण वाढीचे प्रमाण एच पूर्व इतकेच 1.1% असे सर्वात कमी आहे. रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 50 दिवसांपेक्षा जास्त असलेले आणि रूग्णवाढ सरासरी 2% पेक्षा कमी असलेले विभाग खालील प्रमाणे. 

(कंसातील आकडे सरासरी रूग्णवाढीची टक्केवारी )
एम पूर्व 56 ( 1.2%), एल 53 (1.3)

वॉर्डनिहाय आकडेवारी आणि रुग्णवाढीचा हा वेग पाहता आता येत्या काळात कोरोनावर पूर्णपणे मात करण्याच्याच दृष्टीनं प्रशासनाकडून महत्त्वाची पावलं उचलली जाणार आहेत. शिवाय आरोग्य यंत्रणाही या आव्हानाचा सामना करण्यासाठी अधिक सुसज्ज झाल्या आहेत.