मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून थंडी जाणवत आहे. मात्र आगामी दोन दिवसांमध्ये मुंबई आणि महाराष्ट्रातही तापमान वाढण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्याची दिशा थोडी बद्दलल्यानं, मुंबई आणि महाराष्ट्रातील तापमानात काही अंशांनी वाढ होईल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केला आहे. यामुळे मुंबईकरांची थंडी साथ काहीशी सोडणार असल्याचा अंदाज आहे.
दरम्यान, गुरुवारी सकाळी राज्यात नाशिकमध्ये सर्वाधिक कमी 10. 2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर मुंबई बोरिवलीमध्ये सर्वाधिक कमी 14. 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर चंद्रपुरात बुधवारी पाऊस झाला आहे.
मुंबईत या वेळेस थंडीचं प्रमाण जास्त आहे. दरवर्षी मुंबईत हिवाळ्यात काही दिवस थंडी नक्कीच जाणवते.