मुंबईत कोरोना घटतोय...मुंबईकरांनी पाळलेली शिस्त आणि महापालिका व्यवस्थापनाला यश

इतर शहरांतील आकडेवारी सतत भीतीदायक होत चालली आहे आणि त्यामुळे भविष्यात ऑक्सिजनची मोठी गरज निर्माण होणार असल्याचे बीएमसीला आधीच कळले होते.

Updated: May 8, 2021, 02:23 PM IST
मुंबईत कोरोना घटतोय...मुंबईकरांनी पाळलेली शिस्त आणि महापालिका व्यवस्थापनाला यश title=

मुंबई : देशभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात अधिक कोरोना संक्रमीत रुग्ण संख्या पाहायला मिळाली आहे. अशातच मुंबईने मात्र कमाल केली आहे. मुंबईमध्ये असा चमत्कार झाला आहे की, कोरोना संक्रमित रुग्ण संख्या खुपच कमी झाली आहे. मुंबईतील या चमत्कारामुळे मुंबईचे कौतुक केले जात आहे. एका आठवड्यातच  मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 33 हजार 75 वरुन कमी होऊन 10 हजार 736 वर आली आहे. असे सांगितले जात आहे की, ऑक्सिजन पुरवठ्याच्या चांगल्या व्यवस्थापनामुळे हे शक्य झाले आहे. त्यामुळे मुंबईची या विषयी स्तुती होत आहे.

इतर शहरांतील आकडेवारी सतत भीतीदायक होत चालली आहे आणि त्यामुळे भविष्यात ऑक्सिजनची मोठी गरज निर्माण होणार असल्याचे बीएमसीला आधीच कळले, म्हणूनच त्यांनी मुंबईतील सर्व मोठ्या कोविड रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा आधीच केला होता.

यासाठी बीएमसीने रूग्णालयात मोठ्या क्षमतेच्या ऑक्सिजन टाक्या बसवल्या होत्या आणि ऑक्सिजन बेड असलेल्या रुग्णालयात नियमित ऑक्सिजन पुरवठा सुरळीत चालण्यासाठी 24 विभागांमध्ये सहा समन्वय अधिकारी नेमले गेले होते.

इतकेच नाही तर प्रत्येक गरजूंना ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी कस्तुरबा हॉस्पिटल आणि एचबीटी ट्रॉमा सेंटरमध्ये पीएसए तंत्रज्ञानावर ऑक्सिजन प्लांट बसवण्यात आला आहे. त्याशिवाय शहरातील अन्य 12 ठिकाणी 45 मेट्रिक टन पीएसए तांत्रिक ऑक्सिजन प्लांट बसवण्याचे कामही या दिवसांत सुरू आहे. मुंबईला सध्या वेगवेगळ्या कंपन्यांकडून दररोज 235 मेट्रिक ऑक्सिजन मिळत आहे.

धारावीतील रुग्ण संख्या अधीक असताना, कोरोना प्रकरण शून्यावर आणण्यात महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यशस्वी झाले तेव्हा यांची सर्वत्र चर्चा होत होती. तसेच आता ही कोरोनाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान रुग्णसंख्या कमी करुन लोकांच्या चर्चेला पुन्हा उधान आले आहे.

या सगळ्यासाठी बीएमसीने स्वतंत्र टीम तयार केली आहे, जी ऑक्सिजन पुरवण्याच्या संपूर्ण प्रवासाचा डेटा ठेवतो. म्हणजेच ती टीम ऑक्सिजन सप्लायपासून ते रुग्णालयात ऑक्सिजन पोहोचेपर्यंत संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवते.

जर या पूर्ण प्रोसेसमध्ये काही गडबड झाली असेल तर, त्याचे ही टीम निराकरण करणे आणि हा सर्व डेटा Google ड्राइव्हवर जमा करते. या व्यतिरिक्त, वेगवेगळ्या वेळी सीरो सर्वे करण्याचा महापालिकेच्या निर्णयही फायदेशीर ठरला. ज्यामुळे मुंबईतील रुग्ण संख्या आता कमी झाली आहे.