कोरोनावर उपचार घेत असलेली महिला रुग्णालयातून पळाली

मुंबईतून चक्क रायगडमधील आपल्या गावी पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार 

Updated: May 20, 2020, 09:10 AM IST
कोरोनावर उपचार घेत असलेली महिला रुग्णालयातून पळाली title=

मुंबई : कोरोनाचे संकट कमी होताना दिसत नाहीय. एकीकडे वारंवार सांगूनही लोकं सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीयत. तर दुसरीकडे कोरोनावर उपचार घेत असलेले रुग्ण देखील आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करत नसल्याचे गंभीर वास्तव वारंवार समोर येत आहे. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांचा आकडा कसा कमी करायचा ? हा मोठा प्रश्न उपस्थित होतोय. मुंबईतील एका रुग्णालयातून एक गंभीर प्रकार समोर आला. कोरोनावर उपचार घेत असलेल्या महिलेने आपल्या पतीसह रुग्णालयातून पळ गाठल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

या महिलेने मुंबईतून चक्क रायगडमधील आपल्या गावी पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोग्य यंत्रणेच्या सतर्कतेमुळे ही गंभीर बाब निदर्शनास आली आहे. सोमय्या रुग्णालयात उपचार सुरू असताना तिला पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. 

चिमुकलीची कोरोनावर मात; जादूची छडी घेऊन परीच्या वेशात ती आली अन्...

तेवढ्यात संधी साधून ही महिला तेथून बाहेर पडली आणि नवऱ्याला घेऊन ती महाडमधील किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या करमर या आपल्या गावी पोहोचली. ३५ वर्षे वयाची ही महिला गर्भवती असून दोघेही मोटारसायकलवरून गावी आल्याची माहिती समोर आली आहे. तिच्याकडील कागदपत्र तपासली असता ती कोविड पॉझिटीव्ह असल्याची बाब आरोग्य यंत्रणेच्या लक्षात आली.

पुण्यावरून ५०० किमी पायी चालत गावी आला, तपासणीसाठी जाताना वाटेतच मृत्यू

तिच्या पतीच्या अहवालाबाबत अद्याप संभ्रम आहे . आता दोघा पतीपत्नीना महाडच्या ट्रॉमा केअर युनिटमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार प्रशासनाने गांभीर्याने घेतला असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी दिले आहेत.

रेड झोनमध्ये काय सुरू राहणार

- अत्यावश्यक सेवेची सर्व दुकानं

- इतर दुकानांना परवानगी, त्याबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेणार

- स्थानिक प्रशासनाने परवानगी दिली तर दारूची दुकानं सुरू करता येणार, दारूची होम डिलिव्हरी करता येणार 

- टॅक्सी, रिक्षा सेवा बंद राहणार

- दुचाकीवर एकालाच परवानगी 

- मॉल्स, परवानगी नसलेली दुकाने, परवानगी नसलेली इतर आस्थापनं साफसफाईसाठी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळात सुरू ठेवू शकतात

- दस्त नोंदणी कार्यालय, आरटीओ कार्यालय सुरू करण्याची परवानगी

- विद्यापीठ, महाविद्यालयात उत्तरपत्रिका तपासणी, निकाल लावण्यासाठी ५ टक्के कर्मचारी उपस्थित ठेवण्यास परवानगी

नॉन रेड झोनमधील नियम 

- स्पोर्टस् कॉम्प्लेक्स, स्टेडियम, खुल्या जागा वैयक्तिक व्यायामासाठी सुरू राहणार, पण सामुहिक जमावाला बंदी

- जिल्हांतर्गत बससेवा ५० टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यास परवानगी

- सलून सुरु ठेवण्यास परवानगी 

- सर्व दुकानं आणि बाजारपेठा सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत सुरू राहणार, मात्र गर्दी झाल्यास हे बंद करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेऊ शकते.