Mumbai crime : हाय प्रोफाईल हॉटेल अन् पैशांची गरज... वेश्याव्यवसायाचे रॅकेट चालवणाऱ्या 24 वर्षीय अभिनेत्रीला अटक

Mumbai Crime : दोन दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांनी हायप्रोफायल सेक्स रॅकेटप्रकरणी टीव्ही अभिनेत्री आरती मित्तलला अटक केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईनंतर तीन मॉडेल्सची पोलिसांनी सुटका केली आहे,

Updated: Apr 22, 2023, 12:53 PM IST
Mumbai crime : हाय प्रोफाईल हॉटेल अन् पैशांची गरज... वेश्याव्यवसायाचे रॅकेट चालवणाऱ्या 24 वर्षीय अभिनेत्रीला अटक title=

Crime News : हायप्रोफायल सेक्स रॅकेटप्रकरणी टीव्ही अभिनेत्री आरती मित्तल (aarti mittal) हिला अटक झाल्याच्या वृत्ताला काही तास उलटले नाही तोच आणखी एक सेक्स रॅकेट ( sex racket) मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) समोर आणलं आहे. या प्रकरणी एका 24 वर्षीय भोजपुरी अभिनेत्रीला (bhojpuri actress suman kumari) अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी भोजपुरी अभिनेत्री सुमन कुमारीला अटक करत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने ही कारवाई केली आणि छापा टाकून हे रॅकेट उद्धवस्त केले. 24 वर्षीय सुमन कुमारी मुलींना वेश्या व्यवसायात ढकलण्याचे काम करत असल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सुमन कुमारी या संपूर्ण सेक्स रॅकेटमध्ये मध्यस्थ म्हणून काम करत होती.

मुंबईतील गोरेगाव येथील रॉयल पाम हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी सापळा रचत गुन्हेगारांना पकडण्यासाठी बनावट ग्राहकाला हॉटेलमध्ये पाठवले. पोलिसांच्या योजनेनुसार अभिनेत्री या सापळ्यात अडकली. तिने त्या बनावट ग्राहकाशी प्रत्येक प्रत्येक मॉडेलसाठी 50 ते 80 हजार रुपयांची मागणी करण्यास सुरुवात केली. त्या मॉडेल तिथेच उपस्थित होत्या. त्याचवेळी पोलिसांनी सुमन कुमारी हिला घटनास्थळी पैसे घेताना अटक केली. यानंतर हॉटेलमधून 3 मॉडेल्सचीही सुटका केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमन कुमारी (२४) ही भोजपुरी अभिनेत्री असून ती ग्राहकांना मॉडेल्स पुरवत होती . या मॉडेल्स  मुंबईत येऊन चित्रपटांमध्ये करिअर करण्यासाठी धडपडत होत्या. त्यांना पैशांची गरज होती. त्यामुळे सुमन कुमारीने त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना वेश्याव्यवसायात ढकलले. अभिनेत्री सुमन कुमारी हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटमध्ये मध्यस्थ्याचे काम करत होती.

कोण आहे सुमन कुमारी?

24 व्या वर्षातच सुमन कुमारीने अनेक भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे. लैला मजनू आणि बाप नंबरी, बेटा दस नंबरी यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने महत्त्वाच्या भूमिका साकरल्या आहेत. भोजपुरी सिनेमांशिवाय सुमन ओटीटी शोमध्येही काम करताना दिसली आहे. सुमन गेल्या 6 महिन्यांपासून मुंबईत राहत होती. सुमन मॉडेल्सच्या आर्थिक स्थितीचा फायदा घेत होती आणि त्यांना वेश्याव्यवसायात ढकलत होती.