मुंबई: मध्य रेल्वेला मराठी भाषेचे वावडं आहे का? असे वृत्त झी २४ तासनं नुकतेच दिले. या वृत्तानंतर मध्य रेल्वेला जाग आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाबाहेर वायफायच्या जाहिराती लावण्यात आल्या होत्या. वृत्ताच परिणाम असा की, हे चुकीचे फलक रेल्वेकडून झाकण्यात आले.
या जाहिरात फलकांवर सीएसएमटीऐवजी सीएसटी असा चुकीचा उल्लेख होता. तसंच मिळवा ऐवजी मिलवा, अशी चुकीची भाषा वापरण्यात आली होती. या बातमीची मध्य रेल्वेने तातडीने दखल घेतलीय. संबंधित यंत्रणेला या जाहिरात फलकात तातडीने सुधारणा करण्यास सांगितलंय.
मध्य रेल्वेला मराठी भाषेच वावडं आहे का ? असा सवाल सध्या उपस्थित होतोय. याच कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाहेर वायफाय बद्दल ज्या जाहिराती लावण्यात आल्यात. त्यावर मिळवा ऐवजी मिलवा, तर CSMT ऐवजी CST असा चुकीचा उल्लेख करण्यात आलाय. ही चूक तातडीनं दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेनेनं दिला आहे.