छातीत आरपार सळया घुसल्या, डॉक्टरांनी कामगाराला दिले जीवदान

मुंबईत इमारतीच्या स्लॅपचे काम करताना कामगाराचा तोल गेल्याने त्याच्या पोटात आरपार दोन सळया घुसल्या. तो रक्तबंबाळ झाला, आणि...

Updated: Jan 13, 2018, 06:16 PM IST
छातीत आरपार सळया घुसल्या, डॉक्टरांनी कामगाराला दिले जीवदान title=

मुंबई : इमारतीच्या स्लॅपचे काम करताना कामगाराचा तोल गेल्याने त्याच्या पोटात आरपार दोन सळया घुसल्या. तो रक्तबंबाळ झाला. त्याच अवस्थेत त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. शरीराच्या बाहेरील सळया गॅस कटरने कापल्यानंतर डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न करुन पोटातील सळया यशस्वी शस्त्रक्रिया करुन बाहेर काढल्या आणि त्याला जीवदान दिले.

कफपरेड येथे रहेजा इमारतीच्या तळघरात स्लॅपचे काम सुरु होते. हे काम सुरु असताना राजेंद्र पाल या कामगाराचा तोल गेला. तो जेव्हा खाली पडला त्यावेळी त्याच्या पोटात आरपार दोन लोखंडी सळया घुसल्या. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. 

छाती आणि पोटात सळई

सळया घुसल्यानंतर कामगार राजेंद्र याला धोबी तलाव येथील गोकुळदास तेजपाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी पोटात घुसलेल्या दोन सळया गॅसकटरने कट करून रुग्णाला आणण्यात आले. त्यानंतर अडीच तासांच्या अवघड शस्रक्रियेनंतर रुग्णाच्या छातीमधील आणि पोटातील सळई काढण्यात डॉ. जितेंद्र संकपाळ यांना यश आले. अडीच तासांच्या प्रयत्नानंतर दोन्ही सळया काढण्यात आल्या. कामगार राजेंद्र या रूग्णाची प्रकृती स्थीर आहे.  

दरम्यान, कामगार राजेंद्र याच्या शरीरात दोन सळया घुसल्या तेव्हा त्याच्या हृदयाला आणि फुप्फुसाला सुदैवाने कोणतीही इजा पोहोचली नाही. त्यामुळे रुग्ण जीव घेण्यासंकटातून वाचला, असे डॉ. संकपाळ यांनी सांगितले.

कशी घडली ही घटना

कफपरेडच्या रहेजा चेंबर येथील तळघरात स्लॅपचे काम सुरु आहे. स्लॅपच्या कामाकरिता लोखंडी सळईचा ढाचा उभारण्यात आला होता. सायंकाळी राजेंद्र हा प्लायवूडवरून जात असताना त्याचा तोल गेला आणि तो पडला. त्यावेळी त्याच्या पोटात दोन सळया आरपार घुसल्या आणि तो रक्तबंबाळ झाला.

 गॅस कटर सळया कापल्या

या घडल्या प्रकराची माहिती स्थानिकांनी अग्निशमन दलाला कळवली. त्यानंतर काही वेळातच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झालेत. त्यानंतर गॅस कटरच्या सहाय्याने दोन्ही लोखंडी सळया कापण्यात आल्यात. त्यानंतर त्याला जखमी अवस्थेत गोकुळदास तेजपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अवघड शस्त्रक्रिया

त्यानंतर रुग्णालयाचे प्रमुख वैदयकीय अधिकारी डॉ. हेमंत कुमार यांनी राजेंद्रला तपासले. रात्री उशीरा त्याच्या पोटातील सळईचे तुकडे काढण्यासाठी शस्त्रक्रिया सुरु केली. हे प्रयत्न सुरु असतानाच त्याची प्रकृती चिंताजनक झाली होती. यावर डॉक्टरांनी मात करत यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडली. आता रुग्णाचा धोका टळला असून प्रकृती स्थिर आहे.