मुंबई : मुलुंडमधील नाणेपाडा परिसरात शिरलेल्य बिबट्याने सहा जणांना जखमी केलं. या बातमीची दिवसभर चर्चा होती. पण तेवढीच चर्चा भाजपाचे खा. किरीट सोमय्या यांच्या सेल्फीचीदेखील झाली.
नेटकऱ्यांनी खा. सोमय्या यांना सोशल मीडियावर 'ट्रोल' केले.
Suresh Bashidkar Injured , attacked by Tiger at Mulund east Nanipada pic.twitter.com/5Yzpp5Raa5
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 13, 2018
जखमी इसमासोबतचा सेल्फी खा. सोमय्या यांनी ट्वीट करत बिबट्याच्या हल्ल्याविषयी माहिती दिली.
Get him to hospital rather than clicking selfies Sir.
— Kiran Patil (@kiranppat) January 13, 2018
भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी जखमींबरोबर सेल्फी काढून आपल्या असंवेदनशीलतेचं दर्शन घडवल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले.
@KiritSomaiya इथे पण गरबा खेळायला गेले का. #चमकोगिरी #senslesspolitics @BJP4Maharashtra #Hired4Marketing
— Sandesh Madgule (@Sandesh_Madgule) January 13, 2018
सोमय्या एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी हे फोटो आपल्या ट्विटरवर पोस्टही केले.
भाजप खासदार यांची असंवेदनशील मानसिकता बिबट्यानी जखमी केलेल्या सोबत सेल्फी काढून ट्विटर वर.
— Kamlesh Gorule (@GoruleKamlesh) January 13, 2018
स्थानिक रहिवाशांमध्ये या घटनेने भीतीचे वातावरण असताना त्यांचे खासदार मात्र सेल्फी काढण्यात व्यस्त होते.
फालतू नौटंनकी बंद करा
— Anil Sonawane (@ABSonawane487) January 13, 2018
हल्ला करणारा वाघ नव्हता तर बिबट्या होता अशी खोचक सूचना यावेळी करण्यात आली. तर 'सोमय्या यांना इथे पण वाघ दिसतोय' असे म्हणत खिल्ली उडविली आहे. 'इथे पण गरबा खेळायला गेले का ?' असा प्रश्नदेखील विचारण्यात आला.
साहेबांना इथे पण वाघ दिसतोय @ShivSena
— Samir Prabhudesai (@peacewithsamir) January 13, 2018
बिबट्याने नाणेपाडा परिसरात सहा जणांवर हल्ला केल्याची माहिती मिळताच स्थानिक खासदार सोमय्या त्या ठिकाणी आले.
बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांसह इथे आलेल्या पोलिसांबरोबरही त्यांनी सेल्फी काढले.