मुंबईतील आगीच्या घटनेनंतर पुणे-नागपुरातील अग्निशमन विभाग सतर्क

मुंबईतल्या कमला मिल दुर्घटनेनंतर नागपुरातही खबरदारी घेतली जातेय. थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन विभागानं पावलं तातडीनं पावलं उचलायला सुरूवात केलीय.

Updated: Dec 29, 2017, 10:01 PM IST
मुंबईतील आगीच्या घटनेनंतर पुणे-नागपुरातील अग्निशमन विभाग सतर्क title=

मुंबई : मुंबईतल्या कमला मिल दुर्घटनेनंतर नागपुरातही खबरदारी घेतली जातेय. थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन विभागानं पावलं तातडीनं पावलं उचलायला सुरूवात केलीय.

बार हॉटेल्स पब रेस्टॉरंट आणि सभागृहांच्या छतावर तात्पुरते पंडाल उभारण्यास अग्निशमन विभागानं मनाई केलीय. 

अशा ठिकाणी थर्टीफर्स्टसाठी हमखास पार्ट्यांचं आयोजन होतं. त्यासाठी तात्पुरते पंडाल उभारले जातात, आणि एलपीजी गॅस सिलिंडर आणि विद्युत उपकरणांचा वापरही मोठ्या प्रमाणात केला जातो. जे दुर्घटनेला आमंत्रण देणार ठरू शकतं. अशा सर्व जागांचं निरिक्षण करून धोकादायक असलेलं बांधकाम त्वरिक काढण्याचे आदेश अग्निशमन विभागानं दिलेयत.

तर, मुंबईत आगीच्या घटने घटनेच्या पार्श्वभूमीवर एका दिवसात सेफ्टी ऑडीट शक्य नाही, तरी आम्ही सतर्क आहोत असं पुणे पोलिसांनी स्पष्ट केलंय.

शहरातील पब्ज, हॉटेल्स अथवा कोणत्याही इमारतीत सुरक्षा निकष पाळले जातात की नाही हे पाहण्याची जबाबदारी मनपाची आहे. 

बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देताना व्यावसायिक परवाना देताना या गोष्टी पाहिल्या जातात. आम्ही महापालिकेला गरजेनुसार पोलीस बळ पुरवू शकतो असं पुणे पोलिसांनी स्पष्ट केलंय.

मुंबईतील आगीच्या घटनेनंतर पुणे-नागपुरात अलर्ट