close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

बुलेट ट्रेन कशाला पाहिजे?, मुंबईतील पुलांची श्वेतपत्रिका काढा - शरद पवार

मुंबईतील पुलांची श्वेतपत्रिका काढली पाहिजे. दिल्लीत मेट्रो केली आहे. त्याच धरतीवर मुंबईतील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. 

Updated: Mar 15, 2019, 04:48 PM IST
बुलेट ट्रेन कशाला पाहिजे?, मुंबईतील पुलांची श्वेतपत्रिका काढा - शरद पवार
संग्रहित छाया

मुंबई : शहरात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे काल जो अपघात झाला, तो मुंबईकरांच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. या पुलाचे ऑडीट झाले होते, त्याचीच चौकशी करण्याची गरज आहे. ऑडीट व्यवस्थित झाले होते का? हेही तपासले पाहिजे. या शहरात वाहतुकीची व्यवस्था सुधारण्यासाठी रेल्वे मंत्रालय आणि केंद्र सरकारने गांभीर्याने बघण्याची गरज आहे. तसेच  मुंबईतील पुलांची श्वेतपत्रिका काढली पाहिजे. दिल्लीत मेट्रो केली आहे. त्याच धरतीवर मुंबईतील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. त्याचवेळी पवार यांनी बुलेट ट्रेनला विरोध दर्शवला. आपल्याकडे बुलेट ट्रेन होणार आहे, त्यासाठी सव्वा लाख कोटी खर्च होणार आहे. हा पैसे बुलेट ट्रेनवर खर्च करण्याऐवजी मुंबईतली रेल्वे सेवा सुधारण्यासाठी खर्च करावा. बुलेट ट्रेनऐवजी मुंबई ते दिल्ली, दिल्ली ते कोलकता, कोलकता ते चेन्नई, चेन्नई ते मुंबई या मार्गाचे जाळे सक्षम करावे, अशी मागणी केली.

पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

- मुंबईत काल जो अपघात झाला, तो मुंबईकरांच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे
मुंबईतील पुलांची श्वेतपत्रिका काढावी
- मुंबई शहरात विरार ते चर्चगेट आणि कर्जत ते सीएसटीएम या मार्गावर 1 कोटी लोक प्रवास करतात
- यात वेगवेगळे अपघात होतात, त्या अपघातात रोज 15 ते 20 अपघात होतात आणि वर्षाला 2500 ते 3000 लोक मृत्यू होतात, तर महिन्याला 1 ते 2 हजार जखमी होतात
- पहिल्यांदा रेल्वे स्टेशनपासून सुधारणा करणे गरजेचे आहे
- मुंबईतील बहुतांश पुल लोखंडाचे आहेत
- बाहेरगावी जे ब्रिज असतात त्याची रचना वेगळी असते
- रेल्वेच्या वतीने पुलावर ग्रेनाईट बसवले आहेत, त्यावरून घसरण्याचा प्रसंग मुंबईकरांवर येतो, त्यातूनही मोठ्याप्रमाणात अपघात होतात
- रेल्वेत कोंबल्यासारखे लोक असतात, ते बघून मला खंत वाटते
- मीही या राज्याचा प्रमुख होतो
- दिल्लीत मेट्रो केली आहे, या शहरात वाहतुकीची व्यवस्था सुधारण्यासाठी रेल्वे आणि केंद्र सरकारने गांभीर्याने बघण्याची गरज आहे
- आपल्याकडे बुलेट ट्रेन होणार आहे, त्यासाठी सव्वा लाख कोटी खर्च होणार आहे
- हा पैसे बुलेट ट्रेनवर खर्च करण्याऐवजी मुंबईतली रेल्वे सेवा सुधारण्यासाठी खर्च करावा
- याशिवाय मुंबई ते दिल्ली, दिल्ली ते कोलकता, कोलकता ते चेन्नई, चेन्नई ते मुंबई या मार्गाचे जाळे सक्षम करावे बुलेट ट्रेनऐवजी
- मुंबईतील या पुलाचे ऑडीट झाले होते, त्याचीच चौकशी करण्याची गरज आहे
- ऑडीट व्यवस्थित झाले होते का?
- मध्य रेल्वेने नोव्हेंबर 2015 ला राज्य सरकारला पत्र दिलं होतं
- त्यात मुंबईतील ओव्हर ब्रिजच्या दुरावस्थेची माहिती दिली होती