मुंबई : मुंबईत सकाळपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर कायम आहे. दादर, परेल, सायन, माटुंगा, वडाळा या भागात पाणी साचलं असून गणेशभक्तांची तारांबळ उडालीय. परेल पूर्वेला ब्रीजखाली पाणी साचलं असून वाहतूकीचा मार्ग बदलण्यात आलाय.
तर सायन, माटुंगा ब्रीजखालीही पाणी साचलंय. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूकीचे प्रचंड कोंडी झालीय. विक्रोळी ते लालबागपर्यंत वाहतूक धीम्यागतीने चालू आहे.
आज बाप्पाच्या स्वागताला वरूणराजाने दमदार हजेरी लावली. शहरात सकाळी ठिकठिकाणी वाजतगाजत श्री गणेशाचं आगमन होत असताना मुसळधार पावसाला सुरूवात झाली. अचानक आलेल्या या पावसाने मिरवणूकीत असलेल्या गणेशभक्तांची चांगलीच धावपळ झाली.