मुंबई : मुंबईतल्या मेट्रो प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिलीय.
कोणताही विचार न करता अधिकारी वृक्षतोडीला परवानगी देतातच कसे? असा सवालही न्यायालयानं केलाय. त्यामुळं मुंबई मेट्रोचं काम रखडण्याची शक्यता आहे.
लोकांना विश्वासात न घेता वृक्ष तोडण्यासाठी परवानगी कशी काय दिली? असा प्रश्न न्यायालयानं महापालिकेलाही केलाय.
एखाद्या ठिकाणी वृक्षतोड होत असल्यास त्याची जाहिरात महत्त्वाच्या वृत्तपत्रांमध्ये का दिली नाही? असा सवालही न्यायालयानं उपस्थित केला आहे.
एखादं झाड तोडलं जाणार असेल तर ते लोकांना का कळू दिलं जात नाही? हा प्रकार सहन केला नसल्याची तंबीही न्यायालयानं दिलीय. उद्या या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार आहे.