पैशांनी भरलेलं पाकिट आणि मुंबई....! मुंबईकर ठरले जगातील दुसऱ्या क्रमांकाचं प्रामाणिक शहर

Mumbai Honest Cities : जगातील कोणत्या शहरात लोक जास्त प्रामाणिक आहेत याच आढावा रीडर्स डायजेस्टने घेतला.  यात भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा समावेश करण्यात आला आहे.

श्वेता चव्हाण | Updated: May 14, 2023, 12:32 PM IST
पैशांनी भरलेलं पाकिट आणि मुंबई....! मुंबईकर ठरले जगातील दुसऱ्या क्रमांकाचं प्रामाणिक शहर   title=
Mumbai Honest Cities

Mumbai Honest Cities in the World : जगातील विविध शहरांतील नागरिकांचा प्रामाणिकपणा तपासण्यासाठी अमेरिकेतील प्रसिद्ध इंग्रजी मासिक 'रीडर्स डायजेस्ट'ने (Reader's Digest) 16 प्रमुख शहरात एक सर्व्हे केला. या सर्व्हेमध्ये 16 शहरांमध्ये रस्त्यावर पैशांनी भरलेली 192 पाकिटे सोडून एक अनोखे सर्वेक्षण केले. यामगे जगातील कोणत्या शहरातील लोकांची विचारसणी आणि मानसिकता कशी आहे? शहर सर्वात प्रामाणिक आहे का? हे त्यांना जाणून घ्यायचे होते. त्यामुळे त्यांनी the wallet experiment नावाची मोहिम सुरु केली होती. यामध्ये फिनलॅण्डची राजधानी असलेल्या हेलसिंकीला (Helsinki) जगातील पहिल्या क्रमाकांचे प्रामाणिक शहर असल्याचा मान मिळाला. तर भारताची आर्थिक राजधानी असलेले मुंबई (Mumbai) हे जगातील दुसरे मान्यताप्राप्त शहर ठरले आहे.

'अशी' केली प्रामाणिकपणाची तपासणी

रीडर्स डायजेस्टने जाणूनबुजून जगातील 16 प्रमुख शहरांमध्ये एकूण 192 पाकिटे गमावली. अशाप्रकारे जवळपास प्रत्येक शहरात 12 पाकिटे हरविली होती. या सर्व पॅकेटमध्ये एका व्यक्तीचे नाव, पत्ता, फोन नंबर, कौटुंबिक फोटो, कूपन आणि व्यवसाय कार्ड होते. याव्यतिरिक्त, स्थानिक चलनानुसार $ 50 (सुमारे 3,600 रुपये) ची रक्कम देखील ठेवली गेली आणि कोणत्या शहरात किती पॅकेट जमा केले गेले ते तपासण्यात आले. 

कोणत्या शहरातून किती पॅकेट परत मिळाले?

फिनलॅंडच्या हेलसिंकी शहरा, 12 पैकी 11 पॅकेट सुरक्षित परत  मिळवले आणि मुंबईने 12 पैकी 9 पाकिटे परत आणून दिली आणि जगातील दुसरे सर्वात प्रामाणिक शहर बनले. न्यूयॉर्क आणि बुडापेस्ट तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकावर होते. आणि त्यांना 12 पॅकेटपैकी 8 पॅकेट मिळाले. मॉस्को आणि अॅमस्टरडॅममध्ये फक्त 7 पॅकेट्स परत केली गेली. बर्लिन आणि ल्युब्लियानामध्ये 6, लंडन आणि व्हर्सायमध्ये 5 पॅकेट्स परत करण्यात आले आहे. 

हे आहे यादीतील सर्वात शेवटचे शहर

पोर्तुगालच्या लिस्बन शहरात 12 पैकी फक्त एक पॅकेट आले. 12 पैकी फक्त 4 पॅकेट ब्राझीलमधील रिओ डी जनेरियो, स्वित्झर्लंडमधील झुरिच आणि रोमानियामधील बुखारेस्ट, प्राग, झेक प्रजासत्ताकमधील 3 आणि स्पेनच्या माद्रिदमध्ये 2 परत करण्यात आली आहे. 

भारताची आर्थिक राजधानी...

मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असली तरी मनोरंजनाचीही राजधानी आहे. देशातील 25 टक्के व्यापार, 40 टक्के व्यापार बंदरातून आणि 70 टक्के भांडवली व्यवहार भारतातील गंगाजळीत भर घालत असतात. मुंबईत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे.