मुंबई : जगभरात धुमाकूळ घातलेल्या कीकी चॅलेंजची लागण आता रेल्वे प्रवाशांनाही होताना दिसते आहे. मुंबईच्या लोकल ट्रेनसोबत किकी चॅलेंज करतानाचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होतोय. हा व्हिडिओ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर चित्रित झाल्याचं समोर येतं आहे. रेल्वे पोलीस या व्हिडिओत दिसणाऱ्या तरुणाचा शोध घेत आहेत. चालत्या लोकलमध्ये असे प्रयोग करणं जीवघेणं ठरू शकतं. मुंबईकरांनी कुठल्याही ट्रेंडला बळी पडून आपला जीव धोक्यात घालू नये, असं आवाहन आम्ही करत आहोत.
आतापर्यंत शेकडे युजर्सनी हा ट्रेंड फॉलो केला असून, तितके व्हिडिओही सोशल साईट्सवर पोस्ट केले आहेत. हा ट्रेंड फॉलो करणे धोकादायक आहे. या ट्रेंडची लोकप्रियता पाहून दुबई पोलिसांनी किकी डान्स करण्याबाबत धोक्याचा इशाराही दिला आहे. हा डान्स अमेरिका, यूरोप, इजिप्त, जॉर्डन आणि यूएईमध्ये जोरदार ट्रेंड होत आहे. हा ट्रेंड फॉलो करताना अपघाताच्या घटना घडल्याचेही पुढे आले आहे.
विदेशातला हा ट्रेंड भारतात देखील येऊ घातला आहे. मुंबई पोलिसांनी या आधीच याबाबत धोक्याचा इशारा दिला आहे.