Video : एक वेगळीच दुनियादारी! मुंबई लोकलमध्ये 'त्या' दोघांनी वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष, त्यांच्या एका गोष्टीमुळे...

Mumbai Local Train Viral Video : मुंबई लोकलमध्ये मुंबईकरांचं एक वेगळंच आयुष्य असतं. महिला डब्यातील सीटवरुन महिलांची हाणामारीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात. पण सध्यो लोकलमधील एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. 

Updated: Feb 11, 2023, 12:03 PM IST
Video : एक वेगळीच दुनियादारी! मुंबई लोकलमध्ये 'त्या' दोघांनी वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष, त्यांच्या एका गोष्टीमुळे... title=
Mumbai Local Train boy Paying guitar boy sing song kya hua tera vada passengers starts singing Trending Viral Video on Social media

Mumbai Local Train Trending Video : मुंबई लोकल (Mumbai Local Video) ही मुंबईकरांची श्वास...त्यांची लाइफलाइन...तिच्याशिवाय जगं मुंबईकरांना अशक्य...या लोकल ट्रेनमध्ये मुंबईकरांचं (mumbai local train today) दुसरं आयुष्य काम आणि घरात जेवढा वेळ ते घालवतात त्यातील काही वेळ ते याच लोकलमध्ये घालवतात. या लोकलमध्ये एक वेगळीच दुनियादारी ( mumbai local mega block) पाहिला मिळते. याच लोकलच्या वेळापत्राकावर चाकरमान्यांची जीवनगाडी पळत असते. लोकल ट्रेनमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला मिळतात. त्यातील सगळ्यात जास्त फेमस असतात ते महिला डब्यातील हाणामारी...महिला डब्यात सीटवरुन महिलांची जोरदार हाणामारीचे (Women fight in local train) अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video ) होतं असतात. पण सध्या दोन तरुणांचा एक व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. 

'त्या' दोघांनी असं काय केलं...

असं काय या दोन तरुणांनी की सध्या बघ्यावं तिकडे त्यांचीच चर्चा आहे. आता आम्ही तुम्हाला सांगतो की, या दोघांनी लोकल ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान एकाने गिटार घेतली आणि वाजवायला सुरुवात केली. तर दुसरा मुलगा गायला लागला. गाणेही कुठलं क्या हुआ तेरा वादा...हे जुनं गाणं...त्याचा मधुर आवाज आणि त्या तरुणाची गिटारची साथ मग काय...एक वेगळाच माहौल ट्रेनमध्ये पाहिला मिळाला. (Mumbai Local Train boy Paying guitar boy sing song kya hua tera vada passengers starts singing Trending Viral Video on Social media)

अन् मग काय...

पहिल्यांदा हे दोघेचं गाणं गात होते. पण हळूहळू लोकल ट्रेनमधील इतर प्रवाशांनी गायला सुरुवात केली...लोकल ट्रेनमधील हा असा सूरेलप्रवास इतर प्रवासी आपल्या कॅमेऱ्यात कैद करत होते. मुंबई लोकल ट्रेनमधील हे दृश्य जो तो आपल्या कॅमेऱ्यात कैद करत होते. आता हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील aamchi_mumbai नावाच्या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओ भरपूर लाइक्स मिळाले आहेत. प्रत्येक जण हा व्हिडीओ पाहत आहे. हा व्हिडीओ जणू प्रत्येक मुंबईकरांचा व्हिडीओ आहे. सध्या तो प्रत्येक नेटकऱ्यांनाही तितक्याच आवडतोय.