Mumbai Metro: नवरात्रोत्सवात प्रवासाची चिंता नको; मुंबई मेट्रोच्या फेऱ्या वाढणार, पाहा नवं वेळापत्रक

Mumbai News  : नवरात्रोत्सवादरम्यान प्रवाशांना महामुंबई मेट्रोने एक निर्णय घेतला आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवात प्रवासाची चिंता मिटणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Oct 1, 2024, 01:04 PM IST
Mumbai Metro: नवरात्रोत्सवात प्रवासाची चिंता नको; मुंबई मेट्रोच्या फेऱ्या वाढणार, पाहा नवं वेळापत्रक title=
mumbai metro trips will increase during the navratri 2024

Mumbai Metro : सर्वपित्री अमावस्यानंतर 3 ऑक्टोबरपासून दसरापर्यंत नवरात्रोत्सव असणार आहे. या 9 दिवसांमध्ये तरुणी तरुणी गरबा खेळण्यासाठी बाहेर पडतात. ही गोष्ट लक्षात घेत महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने मेट्रो प्रवाशांना दिलासा दिलाय. महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे नवरात्रोत्सवादरम्यान मेट्रो ट्रेन सेवेच्या वाढीव फेऱ्यांचे नियोजन केलंय. मुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेतलाय. एमएमआरडीएचे महानगर आयुक्त, डॉ. संजय मुखर्जी, भाप्रसे यांनी हा निर्णय जाहीर केलंय. (mumbai metro trips will increase during the navratri 2024 )

नवरात्रोत्सवादरम्यान रात्री उशीरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी 7 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर 2024 या कालावधीत अतिरिक्त मेट्रो सेवा देण्यात आलीय. या कालावधीत दररोज 12 अतिरिक्त मेट्रो सेवा चालविण्यात येणार आहे. lतर दोन मेट्रो सेवांमध्ये 15 मिनिटांचा वेळ असेल. यामुळे या उत्सवात सहभागी होऊन मध्यरात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सोयीस्कर आणि किफायतशीर प्रवासाचा लाभ घेता येईल.

या निर्णयाबाबत महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष आणि एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी म्हणाले, 'नवरात्रोत्सव लोकांना एकत्र आणतो आणि सर्व भाविकांना आणि नागरिकांना कार्यक्षम आणि सुरक्षित वाहतूक प्रदान करणे आमची जबाबदारी आहे. मेट्रो ट्रेनच्या सेवा वाढवून आम्ही प्रवाशांना उत्सवादरम्यान रात्री उशीरा होणाऱ्या प्रवासासाठी सोयीस्कर आणि आरामदायक वाहतूक पर्याय प्रदान करीत आहोत.' 
 
महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक, रुबल अग्रवाल यांनी पुढे सांगितले, 'आमच्या प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, आणि नवरात्रोत्सवादरम्यान ट्रेनच्या सेवा वाढवण्याचा निर्णय प्रवासी अनुभव सुधारण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. या अतिरिक्त मेट्रोसेवांमुळे उत्सवात सहभागी होणाऱ्यांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवास सुनिश्चित होईल.'

वाढीव मेट्रो सेवांचे वेळापत्रक

23:00 नंतर नियोजित वाढीव मेट्रो सेवा जाणून घ्या

अंधेरी (पश्चिम) ते गुंदवली:

23:15 - 00:24 
23:30 - 00:39
23:45 - 00:54
00:00 - 01:09
00:15 - 01:24
00:30 - 01:39 

गुंदवली ते अंधेरी (पश्चिम):
23:15 - 00:24 
23:30 - 00:39  
23:45 - 00:54  
00:00 - 01:09

00:15 - 01:24

00:30 - 01:39 

महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आपल्या प्रवाशांना सर्वोच्च दर्जाच्या सेवा पुरविण्यासाठी कटिबद्ध आहे. वाढीव वेळा आणि अतिरिक्त मेट्रो सेवांमुळे सणासुदीच्या काळात प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि सुलभ प्रवासाची सुविधा मिळेल.