मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड जाहीर, पाहा त्यांची कामगिरी?

प्रजा फाऊंडेशनचे मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड जाहीर केले आहे. दरम्यान, सत्ताधारी आमदारांची कामगिरी चांगली नसल्याचे या रिपोर्टवरुन दिसून येत आहे.

Updated: Aug 21, 2018, 05:15 PM IST
 मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड जाहीर, पाहा त्यांची कामगिरी? title=

मुंबई : प्रजा फाऊंडेशनचे मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड जाहीर केले आहे. दरम्यान, सत्ताधारी आमदारांची कामगिरी चांगली नसल्याचे या रिपोर्टवरुन दिसून येत आहे. कामगिरीत काँग्रेसचे अमिन पटेल अव्वल, शिवसेनेच्या सुनील प्रभू दुसऱ्या क्रमांकावर तर भाजपचे अतुल भातखळकर तिसऱ्या स्थानी असून भाजपचे राम कदम सर्वात शेवटच्या स्थानी आहेत. भाजपचे तमिळ सेल्वन आणि सेनेचे संजय पोतनीस यांचीही कामगिरी खालावल्याचे दिसून येत आहे.

तर दुसरीकडे सत्ताधारी आमदारांपेक्षा विरोधी आमदारांचे काम चांगले असल्याचे दिसून येत आहे. भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांची सरासरी गुणसंख्या ५८ टक्के इतकी आहे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची गुणसंख्या ६२ टक्के इतकी आहे. त्यामुळे सत्ताधारी आमदार आपल्या कामगिरीत कमी पडल्याचे चित्र असून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच काही आमदारांच्या गुन्हात वाढ होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

काय आहे या रिपोर्टमध्ये?

- विधानसभा सभागृहात मुंबईमधील आमदारांच्या उपस्थितीत १० टक्के घट 
- विधानसभेत विचारल्या जाणा-या प्रश्नांची संख्याही खालावली
- २४ हजार २९० लोकांचे सर्व्हे घेण्यात आला
- आमदारांवर दाखल गुन्ह्यामध्येही वाढ झालेली आहे. 
- २०१७ मध्ये १३ आमदारांवर गुन्हे नोंदवण्यात आले म्हणजे ३६ टक्के तर २०१८ मध्ये ही संख्या वाढून ४४ टक्के म्हणजे १६ आमदारांवर गुन्हे नोंदवले गेलेत
-भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांची सरासरी गुणसंख्या ५८ टक्के इतकी आहे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची गुणसंख्या ६२ टक्के इतकी होती